Rajendra Singh
Rajendra SinghAgrowon

Rajendra Singh : नद्यांचा ऱ्हास हे संस्कृती नष्ट करण्याचे षड्‍यंत्र : राजेंद्र सिंह

नद्या संपल्या तर संस्कृती संपेल त्यामुळे विकासाच्या नावावर होणारा विनाश थांबवीत पाण्याबाबत साक्षरता वाढविण्याची गरज जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.

वर्धा : नद्या या भारतीय संस्कृतीचा (Indian Culture) भाग असल्याचे सांगितले जाते. मात्र एकविसाव्या शतकात नद्यांचे अस्तित्वच संपत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे. नद्या संपल्या तर संस्कृती संपेल त्यामुळे विकासाच्या नावावर होणारा विनाश थांबवीत पाण्याबाबत साक्षरता वाढविण्याची गरज जलपुरुष राजेंद्र सिंह (Rajendra Singh) यांनी व्यक्त केली.

Rajendra Singh
Tur Crop Management : तुर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कोणते उपाय कराल?| Agrowon | ॲग्रोवन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘चला जाणू या नदीला’ या नदी संवाद यात्रेच्या निमित्ताने रविवारी (ता. २) आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. सेवाग्राम येथील यात्री निवास सभागृहात हे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विनोद बोधनकर, नरेंद्र चूग, प्रमोद देशमुख, रमाकांत कुलकर्णी, जयाजी पाईकराव, स्नेहल दोंदे, सुमंत पांडे उपस्थित होते.

Rajendra Singh
Crop Damage : नुकसानग्रस्तांना पीकविम्याचा लाभ द्या,

राजेंद्र सिंह पुढे म्हणाले, की भारतात नद्यांचा संबंध संस्कृतीशी जोडला जातो. परंतु काही नद्या सोडल्या तर इतर नद्यांचा मात्र विकासाच्या नावाखाली विध्वंस केला जात आहे.आस्थेशी संबंध जोडत काही नद्यांचे संवर्धन केले जात असताना काही नद्यांचे पात्र कमी झाले,

Rajendra Singh
Crop Damage : अतिवृष्टिने पिकांचे मोठे नुकसान तरीही नजर अंदाज पैसेवारी ५८ पैसे

त्यांचे खोलीकरण, रुंदीकरण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्या ठिकाणी मानवीवस्त्या उभारल्या जात आहेत. पुढे याच वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने अशांसाठी भरपाईची तरतूद केली जाते. त्यामुळे नदी खोऱ्यांमध्ये अवैध बांधकामाचे प्रमाण वाढले आहे.

नद्या संस्कृती बनवितात तशी नष्ट ही करीत असतात ही बाब सगळ्यांनी लक्षात ठेवत नद्यांचे अस्तित्व जपण्यासाठी पुढे आले पाहिजे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.‘चला जाणूया नदीला’ या संवाद यात्रेच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२३ पर्यंत ७५ नद्यांची यात्रा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा आणि पश्‍चिम वाहिनी नद्या या पाच नदी खोऱ्यातील ७५ नद्यांचा त्यामध्ये समावेश आहे. याचा अहवाल तयार करण्यात येणार असून तो शासनाला सोपविला जाईल. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मोहिमेला बळ दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com