Kharif Season 2023 : खरिपासाठी ३२ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. हंगामासाठी ३२ हजार ६१९ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.
Rabi Seed
Rabi SeedAgrowon

Sangli News यंदाच्या खरीप हंगामाची (Kharif Season 2023) तयारी कृषी विभागाने (Agriculture Department) सुरू केली आहे. हंगामासाठी ३२ हजार ६१९ क्विंटल बियाण्यांची मागणी (Seed Demand) केली आहे.

खरीप हंगामात बियण्यांची कमतरता भासू नये यासाठी आतापासून काटेकोर नियोजन सुरू केले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात सरासरी २ लाख ५५ हजार हेक्‍टर क्षेत्र होते. यंदाच्या हंगामात सरासरी २ लाख ४७ हजार ८२६ हेक्‍टर क्षेत्र निश्‍चित केले आहे. त्यानुसार प्रत्येक पिकाचे क्षेत्र अंदाजे निश्चित केले आहे. त्यानुसार बियाणे किती आवश्यक आहे. याचा अंदाज घेऊन खासगी कंपनी आणि ‘महाबीज’कडे बियाण्यांची मागणी केली आहे.

Rabi Seed
Cotton Seed Rate : बीटी कापूस बियाणे दरात केंद्राकडून मोठी वाढ

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा होतो. गेल्या दोन वर्षात सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी घरचेच वापरावे असा सल्ला कृषी विभागाने दिला होता.

त्यामुळे सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासली नाही. परंतु गेल्यावर्षी उन्हाळी सोयाबीनचे नुकसान जाले होते. मात्र, यंदा उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा घटला आहे.

त्यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीनचे बियाणे कमी पडू नये यासाठी कृषी विभागाने आतापासूनच तयारी केली आहे. शिराळा तालुक्‍यात भात पिकाचे क्षेत्र अधिक असते. त्यानुसार बियाण्यांची मागणी केली आहे. ज्वारी, बाजरी या पिकांचीही पुरेशी मागणी केली आहे.

Rabi Seed
Seed Production Business : बीजोत्पादनाला जोडधंदा बनवत उत्पादन वाढ करा : कलंत्रे

जिल्ह्यात बियाण्यांमध्ये भेसळ होऊन शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने सर्व तयारी केली आहे. बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

खरीप हंगामात लागणारे बियाणे मॉन्सूनपूर्वी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाने नियोजन केले आहे.

खरीप हंगामासाठी बियाणे मागणी स्थिती

पीक बियाणे (क्विंटलमध्ये)

भात ५६५७

ज्वारी ३०००

बाजरी २०५०

तूर ५३७

मूग १७७

उडीद १०३७

पीक बियाणे (क्विंटलमध्ये)

भुईमूग १२५३

सूर्यफूल २२१

मका ७००४

कापूस १४

सोयाबीन ११६६८

एकूण ३२६१९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com