Electricity : वीज कंत्राटी कामगारांना बोनस मिळण्याची मागणी

वीज कंत्राटी कामगारांनाही दिवाळीपूर्वी वेतन आणि बोनस मिळावा, अशी मागणी वीज कंत्राटी कामगार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Mahavitaran
MahavitaranAgrowon

पुणे : राज्यातील महावितरण, (Mahavitaran) महापारेषण (Mahaparesh)आणि महानिर्मिती (Mahanirmite) या तीनही वीज कंपनीतील सर्व कायम कामगारांना दिवाळीपूर्वी वेतन मिळते, तसेच त्यांना बोनसही मिळतो. त्याप्रमाणेच वीज कंत्राटी कामगारांनाही दिवाळीपूर्वी वेतन आणि बोनस मिळावा, अशी मागणी वीज कंत्राटी कामगार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadnvis) यांच्याकडे केली आहे.

Mahavitaran
Electricity : चार मुलांच्या मृत्यूप्रकरणी कठोर कारवाई करा

राज्यात सुमारे ३२ हजार कंत्राटी वीज कर्मचारी आहेत. वीजबिले गोळा करणारे कामगार, सुरक्षारक्षक, मीटर रीडर व अन्य कंत्राटी पद्धतीवरील सर्व प्रकारचे कामगार यांना दिवाळीपूर्वी वेतन अथवा अॅडव्हान्स न मिळाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळी साजरी करणे अडचणीचे होईल.

त्यामुळे राज्यातील वीज कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व महामंत्री सचिन मेंगाळे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com