
चास : आखरवाडी (ता. खेड) येथे चास कमान धरणाचा उजवा कालवा फुटून (Canal Burst) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई (Compensation To Farmers) देण्याची मागणी आखरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली.
यासाठी पाटबंधारे विभागाला (Irrigation Department) निवेदन देण्यात आल्याची माहिती सरपंच मोनिका मुळूक यांनी दिली.
आखरवाडी येथे मंगळवारी (ता. ११) चास-कमान धरणाचा उजवा कालवा फुटून संबंधित भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेली गहू, हरभरा, व ज्वारीच्या पिकासह काही दिवसांपूर्वी लागवड केलेल्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते.
कृषी विभागाने या नुकसानीचा पंचनामा केला होता. यावेळी राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. अरूण मुळूक, सरपंच मोनिका मुळूक, मंजाबापू मुळूक, समीर मुळूक, अशोक मुळूक, सोमनाथ मुळूक, दिगंबर मुळूक यांसह अन्य शेतकरी उपस्थित होते. त्यांच्याकडून निवेदन धरणाचे शाखा अभियंता एम. एम. गायकवाड, काळूराम दाते यांनी ते स्वीकारले. योग्य मोबदला शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.