Nilesh Lanke : तनपुरे कारखानाप्रश्नी बचाव कृती समिती सोबत : आमदार लंके

राहुरी येथे तहसील कार्यालयासमोर केल (शुक्रवारी) उपोषणस्थळी भेटीप्रसंगी आमदार लंके बोलत होते.
Nilesh Lanke : तनपुरे कारखानाप्रश्नी बचाव कृती समिती सोबत : आमदार लंके

नगर : तनपुरे साखर कारखाना (Tanpure Sugar Mill) सुरू व्हावा, मागील सहा वर्षांतील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, या मागण्यांसाठी कारखाना बचाव कृती समितीतर्फे सुरू असलेल्या उपोषणास केवळ पाठिंबा नाही, तर मी तुमच्याबरोबर आहे. वेळप्रसंगी जिल्हा बँकेसमोर मंडप टाकून उपोषणाला बसेन, असे पारनेरचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सांगितले.

Nilesh Lanke : तनपुरे कारखानाप्रश्नी बचाव कृती समिती सोबत : आमदार लंके
Tanpure Sugar Mill : राहुरीचा ‘तनपुरे कारखाना’ जिल्हा बँकेच्या ताब्यात

राहुरी येथे तहसील कार्यालयासमोर केल (शुक्रवारी) उपोषणस्थळी भेटीप्रसंगी आमदार लंके बोलत होते. चक्रीउपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता. कारखाना बचाव कृती समितीचे संयोजक अमृत धुमाळ, राजू शेटे, पंढरीनाथ पवार, बाळासाहेब जठार, दादासाहेब पवार यांनी आमदार लंके यांच्यासमोर कारखान्यातील गैरव्यवहाराचा पाढा वाचला. तहसीलदार फसियोद्दीन शेख पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे उपस्थित होते.

Nilesh Lanke : तनपुरे कारखानाप्रश्नी बचाव कृती समिती सोबत : आमदार लंके
Sugar Industry : तेरा साखर कारखान्यांना मिळणार ९६ कोटींची थकहमी

लंके म्हणाले, की डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा राज्यात नावलौकिक होता. कारखाना पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येत होत्या. मी पण सहलीच्या निमित्ताने कारखाना बघितला आहे. आज कारखान्याची दयनीय अवस्था झाली आहे. कारखान्यात किती भ्रष्टाचार झाला. हे मला आत्ता समजले.

कारखाना सुरू होण्यासाठी मी स्वतः तुमच्या बरोबर असणार आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशी‌ संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बाहेर असल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाईल. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा केली आहे. वेळप्रसंगी तुमच्याबरोबर उपोषणाला बसण्याची तयारी आहे असे लथके म्हणाले

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com