भाजीपाला रोपांच्या मागणीत होतेय वाढ

गेल्या महिन्यात अपेक्षित पाऊस झाला. त्यामुळे भाजीपाला लागवडीसाठी शेतकरी पुढे येत आहेत. येत्या आठवड्यात भाजीपाला लागवडीस गती येईल. त्यामुळे त्याच्या रोपांच्या मागणीत वाढ झाली आहे.
Vegetable
Vegetable Agrowon

सांगली ः जिल्ह्यात गेल्या महिन्यात अपेक्षित पाऊस (Rain) झाला. त्यामुळे भाजीपाला लागवडीसाठी (Vegetable Cultivation) शेतकरी पुढे येत आहेत. येत्या आठवड्यात भाजीपाला लागवडीस गती येईल. त्यामुळे त्याच्या रोपांच्या (Vegetable Seedling) मागणीत वाढ झाली आहे. त्यातच गणपती-गौरी उत्सव असल्याने शेपूच्या भाजीपाल्याच्या क्षेत्रात वाढ होईल, अशी माहिती उद्योगातील जाणकारांनी दिली.

Vegetable
Vegetable : थेट ग्राहकांना‘भाजीपाला बास्केट'ची विक्री

जिल्ह्यात भाजीपाला करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दररोज ताजा पैसा मिळतो आणि इतर पिकांना या पैशाचा आधार दिला जातो. त्यामुळे शेतकरी २० गुंठ्यांपासून ते जास्तीत जास्त चार एकरांपर्यंत भाजीपाला लागवड करतो. मात्र, यंदा वेळेत पाऊस सुरु झाला नाही. त्यामुळे जून महिन्यापासून ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीस पुढे आले नाही. परिणामी या दीड ते दोन महिन्यात जिल्ह्यात भाजीपाल्याच्या लागवडीच्या क्षेत्रात सुमारे १५ टक्के घट झाली होती.

Vegetable
Vegetable : नगरला बटाटे, टोमॅटोची अधिक आवक

दरम्यान, जुलैच्या मध्यापासून जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड वाढविली. त्यामुळे भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढ झाली. सध्या टोमॅटो, कोबी, फ्लॉवर यासह शिमला मिरची या पिकांची लागवड वाढत आहे. त्यांची रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑर्डरही दिल्या आहेत.

शेपुचे क्षेत्र वाढीचा अंदाज

गणपती आणि गौरीच्या सणानिमित्त शेपूच्या भाजीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी आता शेपूच्या लागवडीची तयारी करु लागला आहे. बहुतांश शेतकरी शेपूची लागवड मुख्य पिकात करतात. मात्र लागवडीसाठी पाऊस अडथळा ठरत आहे. परिणामी सध्या भाजीच्या दरात तेजी आहे. यामुळे जिल्ह्यात शेपूच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीसाठी पुढे येत आहेत. परिणामी, भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.
चेतन पाटील, जीवन रोपवाटिका, तुंग, जि. सांगली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com