जादा ऊसदर मागणीसाठी शिरोळ तालुक्यात पाळला बंद

गेल्या हंगामातील गाळप उसाचा हिशेब द्या आणि या वर्षी एफआरपी पेक्षा जादा दर जाहीर करा, या मागणीकरिता ‘आंदोलन अंकुश’ च्या वतीने शनिवारी (ता. २९) शिरोळ तालुका बंदची हाक देण्यात आली.
  demand of additional dues in Shirol
demand of additional dues in ShirolAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या हंगामातील गाळप उसाचा (Crushing Cane) हिशेब द्या आणि या वर्षी एफआरपी (FRP) पेक्षा जादा दर जाहीर करा, या मागणीकरिता ‘आंदोलन अंकुश’ (Andolan Ankush) च्या वतीने शनिवारी (ता. २९) शिरोळ तालुका बंदची हाक देण्यात आली. तालुक्यातील बहुतांशी गावात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी शनिवारी दिवसभर कार्यकर्त्यांसह शिरोळ नृसिहवाडी मार्गावर ठिय्या मांडला. विविध कारखान्याकडे होणारी ऊस वाहतूक रोखून धरली.

  demand of additional dues in Shirol
Sugar Stock : साखरसाठ्याची अपूर्ण माहिती दिल्यास कोटा रोखू

जिल्ह्यात स्वाभिमानीसह आंदोलन अंकुशनेही जादा ऊस दराच्या मागणीसाठी आंदोलन सुरू ठेवले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलने होत आहेत. शिरोळ तालुक्यामध्ये आंदोलन अंकुशने गेल्या चार दिवसापासून अतिरिक्त दर मागणीसाठी कारखान्याच्या तोडी व ऊस वाहतूक बंद करण्याचे सत्र अवलंबले आहे.

शुक्रवारी (ता. २८) सकाळी साडेदहाच्या सुमारास ऊस वाहतूक रोखण्यावरून, शिरोळ पोलिस व ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर कारखान्यास पाठवले. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून ‘आंदोलन अंकुश’ने शनिवारी शिरोळ तालुका बंदची हाक दिली होती.

  demand of additional dues in Shirol
Cotton Rate: कापूस बाजार अद्यापही दबावात का? | Agrowon

आम्ही आमच्या हक्काच्या मागणीसाठी लढत असताना पोलिसांकडून मात्र कारखानदारांना संरक्षण देण्याचे काम सुरू आहे याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. कारखानदारांना पाठीशी घालण्याचे काम अन्यायी असल्याची प्रतिक्रिया आंदोलन अंकुशचे श्री. चुडमुंगे यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com