Rabbi Season : नांदेड जिल्ह्यातून रब्बीसाठी दोन लाख टन खतांची मागणी

दोन लाख टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. ७० हजार टन खते शिल्लक असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमणशेट्टे यांनी दिली.
Rabbi Season
Rabbi SeasonAgrowon

नांदेड : रब्बी हंगामात (Rabbi Season) चार लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यासाठी दोन लाख टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. ७० हजार टन खते शिल्लक असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमणशेट्टे (Dr. Tanaji Chimanshetty) यांनी दिली.

Rabbi Season
Mixed Cropping : प्रयत्नपूर्वक शेतीतून समृद्धी अन् समाधान

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे रब्बीमध्ये पेरणीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. रब्बीमध्ये सव्वादोन लाख हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत चार लाख हेक्टरवर पेरणी होईल, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त करुन खते व बियाण्यांचे नियोजन केले आहे. यात सर्वाधिक तीन लाख १५ हजार हेक्टरवर हरभरा, ४४ हजार हेक्टरवर गहू पेरणीचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली. जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या चार महिन्यांतच वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२८ टक्के पाऊस झाला आहे. पावसामुळे सिंचन प्रकल्प भरले आहेत. परिणामी जमिनीतील जलस्रोत बळकट झाल्याने रब्बी पेरणी अधिक क्षेत्रावर होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

रब्बीत विक्रमी पेरणीचा अंदाज

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख २४ हजार ६३४ हेक्टर आहे. या तुलनेत यंदा चार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे. यात सर्वाधिक तीन लाख १५ हजार हेक्टरवर हरभरा पेरणीचा अंदाज आहे. यासोबतच गहू ४४ हजार हेक्टर, रब्बी ज्वारी ३० हजार हेक्टर, करडई पाच हजार हेक्टर, रब्बी मका पाच हजार हेक्टरवर पेरणी होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

ग्रेडनिहाय रब्बीसाठी खताची मागणी

खताचा प्रकार सरासरी वापर कृषीची मागणी

युरिया ४६,२०४ ५३,०००

डीएपी २७,७४९ ३५,४५१

एमओपी १०,९५७ २९,०००

एनपीके ५३,०२४ ५५,९०००

एसएसपी १७,१८१ २५,०००

एकूण १,५५,११५ १,९८,३५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com