कृषी अधिकारी असल्याचे भासवून खते विक्रेत्यांकडे पैशांची मागणी

कृषी विभाग सावध; नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
Fertilizer
Fertilizer Agrowon

नाशिक : जिल्ह्यातील खते विक्रेत्यांना (Fertilizer Seller) फोन करून ‘कृषी विभागाचा अधिकारी (Bogus Agriculture Officers) बोलतोय. आपल्याबाबत जादा दराने खते विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे’ असे सांगून पैशांची मागणी करीत तोतयेगिरी करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर कृषी विभाग सावध झाला असून नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे फसवणूक केली जात असल्याबद्दल तक्रार करण्यात आली आहे. मात्र वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन केले जात असल्याने टोळी सक्रिय झाल्याचा संशय निर्माण झाला आहे.

Fertilizer
Fertilizer : लिंकिंगला विरोध करताच तपासणी मोहीम

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अज्ञात व्यक्ती ‘मी नाशिक वरुन शिंदे साहेब बोलतोय’ असे सांगून जिल्ह्यातील रासायनिक खत विक्रेते यांना ९४०४७०९९५० या मोबाईल नंबरवरून फोन करून पैशांनी मागणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पैशांची मागणी होत असल्याने नांदगाव, सटाणा व येवला तालुक्यातील काही खत विक्रेत्यांना फोन येत असल्याबाबत समोर आले आहे. हे प्रकरण कृषी विभागाने गांभीर्याने घेतले असून फोन करणारी व्यक्तीचा कृषी विभागाशी किंवा या कार्यालयाशी कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Fertilizer
Fertilizer : ‘एक खत’ समस्या अनेक

या बाबत जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी यांच्या कार्यालयाने नाशिक विभागीय सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, खत निरीक्षक तथा तालुका कृषी अधिकारी, पंचायत समित्यांचे सर्व कृषी अधिकारी यांना या फसवणुकीबाबत कळविले आहे. असा प्रकार आढळल्यास तत्काळ सबंधितांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे सूचित केले आहे. यासह नाशिक जिल्हा ॲग्रो डीलर्स असोसिएशन यांनाही पत्र दिले आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते यांना याबाबत कळवावे, असा प्रकार आढळून आल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल

फोन करणारी व्यक्ती खत विक्रेत्यांना कृषी विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून पैशाची मागणी करीत असून कृषी विभागाची बदनामी करीत आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, या मागणीचे पत्र जिल्हा परिषदेचे कृषिविकास अधिकारी रमेश शिंदे यांनी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांना पत्र दिले आहे. ज्यामध्ये ९५२९३६३४१९, ९१४६६९७७५२, ७८२२८६६६४७, ९१५९९७०३६७, ७५८८०९७३५१ अशा वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कृषी निविष्ठा विक्रेत्यांना असे फोन आल्यास कृषी विभाग किंवा नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधून तक्रार करावी. होणारी संभाव्य फसवणूक टाळावी.
रमेश शिंदे, कृषी विकास अधिकारी, नाशिक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com