Apmc Election : बाजार समिती निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात मोर्चेबांधणी

नागपूर खंडपीठाने नुकताच निकाल देऊन ३० एप्रिलपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
Apmc Election
Apmc ElectionAgrowon

कऱ्हाड : बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारांची (APMC Voter) नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली.

त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या कृषी पतसंस्था (सोसायटी), बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायतींच्या सदस्यांना नवीन मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल.

त्यासाठी त्यांनी स्वतःहून उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज करायचे आहेत. या नवीन मतदारांमुळे जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुका (APMC Election) चुरशीने होण्याची चिन्हे आहेत.

नागपूर खंडपीठाने नुकताच निकाल देऊन ३० एप्रिलपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान निवडणुकांसाठी राज्य सहकारी प्राधिकरणाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार मतदार यादीत जुन्याच सदस्यांची नावे होती.

दरम्यान, ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. काही सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका अजूनही सुरुच आहेत.

नव्याने निवडून आलेल्या व येणाऱ्या सदस्यांना बाजार समितीच्या मतदारयादीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.

त्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने त्यामध्ये सुधारणा करणारी अधिसूचना जारी केली आहे.

त्यानुसार आता ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थांच्या नवीन निवडून आलेल्या सदस्यांना मतदार यादीत समाविष्ट करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरु आहे.

Apmc Election
Pune APMC Election " तब्बल २० वर्षांनी होणार पुणे बाजार समिती निवडणूक

बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर पाच दिवसापर्यंत नवीन सदस्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, असे त्या आदेशात नमुद आहे.

मात्र संबंधित नवीन सदस्यांना उपनिबंधकांकडे त्यासाठी अर्ज करावा लागेल. त्या अर्जावर उपनिबंधक पडताळणी करून निर्णय घेतील.

सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, पाटण, जावली, कोरेगाव, फलटण, वाई, वडूज, लोणंद या नऊ बाजार समित्यांसाठी निवडणुका होतील. सोसायटी गटातून ११ सदस्य निवडले जातात. त्यामध्ये खुल्या गटातील उमेदवारांसह दोन महिलांचा समावेश असतो.

ग्रामपंचायतींतून चार सदस्य निवडले जातात. त्यात अनुसूचित जमातीमधील एक, एक आर्थिक दुर्बल आणि अन्य दोन सदस्य निवडले जातात. आडत व्यापारी गटातून दोन तर हमाल मापाडी गटातून एक सदस्य असे १८ सदस्य निवडले जातात.

Apmc Election
Mumbai APMC: मुंबई बाजार समिती काबीज करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनसुब्यांना भाजपाकडुनच सुरूंग
मतदार यादीत नाव समाविषअट करण्यासाठी कृषी पतसंस्था (सोसायटी), बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायतीच्या सदस्यांना उपनिबंधकांकडे अर्ज दाखल करता येईल. उपनिबंधक कार्यालयाकडून त्या अर्जाची चौकशी केली जाईल. त्यानंतर निवडणूक अधिकारी त्या यादीत बदल करतील, असे म्हटले आहे. त्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत हरकतीही मागविण्यात आल्या आहेत.
मनोहर माळी, जिल्हा उपनिबंधक, सातारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com