Rabi Jowar : औरंगाबाद तालुक्यात दोन हजार हेक्टरवर रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिके

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नाने २०२३ हे वर्ष जागतिक पौष्टिक तृणधान्ये वर्षे म्हणून जगभर साजरे करण्यात येत आहे.
Rabi Jowar Experiment
Rabi Jowar ExperimentAgrowon

Rabi Jowar Experiment औरंगाबाद : तालुका कृषी अधिकारी औरंगाबाद कार्यक्षेत्रात २०० क्विंटल ज्वारी बियाणे (Jowar Seed) कृषी सहायक मार्फत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. त्याद्वारे सुमारे २००० हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिक (Jowar Crop Experiment) अंतर्गत पेरणी झाली, असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी विश्‍वास जाधव यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नाने २०२३ हे वर्ष जागतिक पौष्टिक तृणधान्ये वर्षे म्हणून जगभर साजरे करण्यात येत आहे.

त्यानिमित्ताने आपल्या देशातील बाजरी, ज्वारी, नाचणी, भगर, राळा, सावा इत्यादी पारंपरिक पौष्टिक तृणधान्येचे आहारातील महत्त्व समजावून नव्या पिढीला पुन्हा ओळख करून देऊन त्यांचा दैनंदिन आहारात जास्तीत जास्त समावेश करून घेण्याच्या उद्देशाने संपूर्ण जगभर विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

Rabi Jowar Experiment
Jowar Sowing : ज्वारीचा घटता पेरा चिंताजनक

त्याचाच एक भाग म्हणून गंगापूर जहाँगीर, ता. औरंगाबाद येथे मंडळ कृषी अधिकारी विश्‍वास जाधव व कृषी सहायक श्रीमती सायराबानो मिर्झा आणि प्रतिभा गिते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम प्रत्यक्ष ज्वारीच्या शेतावर घेण्यात आला. त्या वेळी श्री. जाधव बोलत होते.

Rabi Jowar Experiment
Rabi Jowar : रब्बीत गल्ले बोरगाव हे ‘सुपर मोती’चे करा

या कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी श्री. जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा इत्यादी पौष्टिक तृणधान्येमध्ये असलेले विविध गुणधर्म विशद करून मानवी आरोग्याला त्यांचे असलेले महत्त्व समजावून सांगितले.

तसेच सध्याच्या आहारात गहू व तांदूळ यांचा अतिरिक्त वापर होत असल्याने शरीराला आवश्यक ते पोषण मिळत नसल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांनी सजग होऊन आपल्या दैनंदिन जीवनात बाजरी, ज्वारी, नाचणी इत्यादींचा समावेश करण्याचे आवाहन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com