बोंडअळी निर्मूलनासाठी सुरक्षा गाठ तंत्रज्ञानाचे सावखेड्यात प्रात्यक्षिक

बोंड अळी सुरक्षा गाठ ही जापनीज तंत्रज्ञान आहे. यात एक बारीक काठी असते. त्याला न दिसणारे छिद्र असतात. ज्याप्रमाणे आपण फेरोमॅन सापळ्यामध्ये ल्युर्स लावतो त्याऐवजी या स्टीककडे नर आकर्षित होत असतो.
Cotton
CottonAgrowon

अकोला ः केंद्राच्या कापूस एकात्मिक व्यवस्थापन (Integrated Crop Management) प्रकल्पांतर्गत (बंधन) सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन येथे माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी यांच्या प्रमुख उपस्थितीत पथकाने भेट देऊन बोंड अळी (Boll Worm) सुरक्षा गाठ या जापनीज तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

Cotton
Cotton : कापूस उत्पादकांसमोर आता किडींचे संकट

या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. उंदीरवाडे, डॉ. भगीरथ चौधरी, केव्हीकेचे डॉ. अनिल तारू, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड, श्री. देशपांडे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहत्रे, प्राचार्य सावंत, मंडळ कृषी अधिकारी डोईफोडे, कृषी सहायक नीलेश ठाकरे, सरपंच संदीप नागरे व इतर उपस्थित होते.

बोंड अळी सुरक्षा गाठ ही जापनीज तंत्रज्ञान आहे. यात एक बारीक काठी असते. त्याला न दिसणारे छिद्र असतात. ज्याप्रमाणे आपण फेरोमॅन सापळ्यामध्ये ल्युर्स लावतो त्याऐवजी या स्टीककडे नर आकर्षित होत असतो. परंतु यात मादी नसते. त्यामुळे मिलन अडथळा तयार होतो. सदर सुरक्षा गाठ सुमारे १२० दिवसांपर्यंत काम करीत असते. ही काठी लावण्याची पद्धत आहे. प्रतिएक ओळींमधील सातव्या झाडावर काठी बांधायची व पाच ओळींनंतर अशीच पद्धत राबवायची असते. अशा प्रकारची ही साधी सोपी पद्धत असल्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com