Agriculture Drone : सुधागडात ड्रोनमार्फत खते फवारणीचे प्रात्यक्षिक

सुधागड तालुक्यात तिवरे येथे मुक्ता नामदेव भोसले यांच्या आंबा बागेमध्ये कृषी विभाग व माऊली ग्रीन आर्मी या संस्थेच्या वतीने गरुडा एरोस्पेस या कंपनीच्या ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी प्रात्यक्षिक नुकतेच देण्यात आले.
Drone Farming
Drone FarmingAgrowon

पाली : सुधागड तालुक्यात तिवरे येथे मुक्ता नामदेव भोसले (Mukta Namdev Bhosle) यांच्या आंबा बागेमध्ये कृषी विभाग व माऊली ग्रीन आर्मी (Mauli Green Army) या संस्थेच्या वतीने गरुडा एरोस्पेस (Garuda Aerospace) या कंपनीच्या ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी प्रात्यक्षिक नुकतेच देण्यात आले. या वेळी मजुरांशिवाय फवारणी (Pesticide Spaying) कशी करायची आणि वेळ व खर्च वाचवण्याबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी जे. बी. झगडे (J.B. Zhagde) यांनी दिली

Drone Farming
Crop Advisory : सोयाबीन, कापूस, तूर पिकाची काळजी कशी घ्याल?

सध्या पिकांवर येणारे कीड व रोगांवर नियंत्रण करण्यासाठी; तसेच पाण्यात विरघळणारी खते फवारणीद्वारे पिकांना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते. मात्र, यासाठी वेळेवर मजूर मिळणे शक्य होत नाही.

महागाईमुळे मजुरीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर उपाय म्हणून ड्रोनद्वारे फवारणी व आधुनिक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना ओळख व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गरुडा एरोस्पेस कंपनीच्या प्रतिनिधींनी ड्रोनबाबत तांत्रिक माहिती देऊन सात मिनिटांमध्ये एक एकर क्षेत्रावर प्रत्यक्ष फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

ड्रोन या तंत्रज्ञानामुळे कशा प्रकारे वेळ व पैसे वाचू शकतात. औषधांचे प्रमाण किती घ्यावे, याची माहिती या वेळी कृषी अधिकाऱ्यांनी दिली या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी जे. बी. झगडे, तालुक्यातील कृषी कर्मचारी; तसेच परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुदान मिळणार

महाडीबीटीद्वारे कृषी विभागामार्फत ड्रोन खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी पदवीधर यांना ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त सात लाख पाच हजार अनुदान असेल. तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी ५० टक्के किंवा जास्तीत जास्त पाच लाख इतके अनुदान उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com