प्रात्यक्षिक प्लॉट शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील

कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या सुधारित पीक वाणांचे कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिक प्लॉट शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील.
Agriculture
AgricultureAgrowon

अंबाजोगाई, जि. बीड : कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या सुधारित पीक वाणांचे (Improve Crop Verity) कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिक प्लॉट (Demonstration Plot) शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील. शेतकऱ्यांना आवश्यक महत्त्वाच्या कृषी निविष्ठा (Agriculture Input) केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचे मत कृषी महाविद्यालय अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. एस डी बंटेवाड यांनी व्यक्त केले.

Agriculture
Agriculture Drone : शासन ‘ड्रोन शेती’च्या प्रसारासाठी प्रयत्न करणार

दीनदयाल शोध संस्थान व कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाईच्या वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीनदयाल शोध संस्थान बीडचे प्रकल्प संचालक डॉ. उपेंद्र कुलकर्णी तर उद्‍घाटक म्हणून कृषी महाविद्यालय अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बंटेवाड बोलत होते. या बैठकीला आभासी माध्यमाने बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर व आत्मा प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांची उपस्थिती होती.

Agriculture
Agriculture Supply Chain : गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन

बैठकीचे प्रास्ताविक केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांनी केले. कृषी विज्ञान केंद्रातील बहुशाखीय शास्त्रज्ञांनी विषयनिहाय मागील कामाचे सादरीकरण केले. तसेच पुढील कार्याचा कृती आराखडा मांडला. या वेळी केंद्राने तयार केलेल्या पोस्टर व ४ विविध विस्तार घडीपत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले.

बैठकीला उपस्थित असलेले शेतकरी, अधिकारी यांनी विविध विषयांवर आपले अभिप्राय दिले. जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी व्ही आर राठोड म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर नोंदणीकृत प्रमाणित पायाभूत बियाण्याचे उत्पादन करून बीज उत्पादक शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकऱ्यांना याचा पुरवठा करावा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com