कृषिमंत्रिपदी सत्तार, महसूल विखेंकडे

राज्याच्या कृषिमंत्रिपदी अब्दुल सत्तार, तर महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रिपदी राधाकृष्ण विखे पाटील यांना संधी देण्यात आली आहे.
Maharashtra Governemnt
Maharashtra GovernemntAgrowon

मुंबई : राज्याच्या कृषिमंत्रिपदी अब्दुल सत्तार (Abdul Sattar Agriculture Minister), तर महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रिपदी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil ) यांना संधी देण्यात आली आहे. ग्रामविकास विभाग गिरीश महाजन यांना, तर सहकार मंत्रिपदी अतुल सावे (Atul Sawe) यांची वर्णी लागली आहे.

Maharashtra Governemnt
Crop Insurance : सांगलीत पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता.१४) जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष साह्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद्‍ व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ, तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

इतर १८ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे :

राधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकास

गिरीश महाजन : ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे : बंदरे व खनीकर्म

संजय राठोड : अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे : कामगार

संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत : उद्योग

प्रा. तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार : कृषी

दीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com