Department Of Agriculture : शेतकरी मित्रांच्या नियुक्तीकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष

कृषी विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी कृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत दोन गावांत एक या प्रमाणे शेतकरी मित्रांची नियुक्ती केली जाते.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

नगर ः कृषी विभागाच्या विविध योजनांच्या (Agriculture Department Scheme) प्रसार व प्रसारासह शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी कृषीच्या आत्मा विभागाकडून शेतकरी मित्र (Farmer Friend) नियुक्त केले जातात. मात्र नगर जिल्ह्यात आत्माच्या प्रकल्प संचालकांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी मित्राच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. सध्याचा विचार करता नगर जिल्ह्यात ८०० शेतकरी मित्र नियुक्त करणे गरजेचे असताना केवळ ४९८ मित्रांच्याच नियुक्त्या केल्या आहेत. त्याचा परिणाम कृषी विभागाच्या योजनांवर होत आहे. मात्र आत्मा विभागातील कोणीही याबाबत बोलायला तयार नाही.

कृषी विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी कृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत दोन गावांत एक या प्रमाणे शेतकरी मित्रांची नियुक्ती केली जाते. ग्रामसभांतून या मित्रांची नियुक्ती केली जाते. अन्य कारणांसाठी शेतकरी मित्रांना बारा महिन्यांसाठी १२ हजार रुपये मानधन दिले जाते. दोन वर्षांसाठी या नियुक्त्या असतात. नगर जिल्ह्यातील गावांचा विचार करता शेतकरी मित्र नियुक्त होणे आवश्यक आहे. मात्र अनेक गावांतून ग्रामसभांचे ठराव येऊनही आत्मा विभाग व प्रकल्प संचालकांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी मित्राची नियुक्तीच केली नाही. सध्य स्थितीला ८०० पैकी केवळ ४९८ शेतकरी मित्र कार्यरत आहेत. त्यातही काहींची मुदत संपत आली आहे. काही गावात तर दोन वर्षांपासून नियुक्त्याच केलेल्या नाहीत. काही जुन्या मित्रांचे मानधनही रखडलेले आहे.

पारनेर आणि राहुरी तालुक्यांत एकही शेतकरी मित्र कार्यरत नाही. नगर येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हेच आत्माचे ‘प्रकल्प संचालक’ आहेत. ‘आत्मा’च्या योजनांबाबत फारसे गांभिर्याने ते घेत नसल्याने योजना प्रभावीपणे राबत नाहीत. राज्यात अनेक जिल्ह्यात यंदा ‘धान्य व फळे महोत्सव’ झाला, परंतु निधी असूनही निधी नसल्याचे कारण पुढे करत केवळ उदासीनतेमुळे लोकांची, तसेच शेतकऱ्याची मागणी असूनही धान्य व फळे महोत्सव झाला नाही.

नियुक्त शेतकरी मित्र

कंसात (मंजूर संख्या)

नगर ः १३ (६०)

पारनेर ः ० (६५)

पाथर्डी ः ३७ (७०)

कर्जत ः ६०(१९)

जामखेड ः १३ (४३)

श्रीगोंदा ः ५५ (५७)

श्रीरामपूर ः २४ (२७)

राहुरी ः ० (४९)

नेवासा ः २८ (६५)

शेवगाव ः ३६ (५५)

संगमनेर ः ६७ (८६)

अकोले ः ८२ (९३)

कोपरगाव ः १८ (४०)

राहाता ः २६ (३०)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com