Agriculture Day
Agriculture DayAgrowon

मुर्छित व्यवस्थेला कृषी विभागाने संजीवनी द्यावी

लक्ष्मणाला मुर्छा आल्यानंतर हनुमानाने संजीवनी आणली होती. त्याप्रमाणेच मुर्छा आलेल्या आणि नकारात्मकता भरलेल्या कृषी व्यवस्थेला संजीवनी देण्याचे काम आता कृषी विभागाने करावे.

पुणे ः ‘‘लक्ष्मणाला मुर्छा आल्यानंतर हनुमानाने संजीवनी आणली होती. त्याप्रमाणेच मुर्छा आलेल्या आणि नकारात्मकता भरलेल्या कृषी व्यवस्थेला (Agriculture System) संजीवनी देण्याचे काम आता कृषी विभागाने (Department Of Agriculture) करावे. त्यासाठी शासन आपल्या पाठीशी आहे. राज्यभर तुम्ही यशस्वीपणे राबवलेल्या कृषी संजीवनी मोहिमेतील विस्तार कार्य यापुढेही चालू ठेवा,’’ असे भावनिक आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार (Dheeraj Kumar) यांनी केले.

Agriculture Day
जनावरांतील माज संकलन तंत्रज्ञान म्हणजे काय?

हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी आयुक्तालयात आयोजित केलेल्या कृषी दिनात ते बोलत होते. कृषी संचालक विकास पाटील ((विस्तार व प्रशिक्षण), दिलीप झेंडे (निविष्ठा व गुणनियंत्रण), संचालक सुभाष नागरे व सहसंचालक पोपटराव शिंदे (प्रक्रिया व नियोजन), सहसंचालक सुधीर ननावरे (आस्थापना), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे उपस्थित होते. राज्यातील निवडक प्रगतशील शेतकरी व बचत गटातील यशस्वी शेतकरी उद्योजिकांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

Agriculture Day
केरळ कृषी विद्यापिठाला ड्रोन तंत्रज्ञानासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर

धीरज कुमार म्हणाले,“आजचा दिवस हरितक्रांती आणणाऱ्या वसंतरावांना नमन करण्याचा आणि कष्टकरी शेतकऱ्यांविषयी ऋण व्यक्त करण्याचा आहे. कृषी विभाग अतिशय चांगली कामे करीत आहे. मात्र, व्यवस्थेला काहीशी मुर्छा आली असून नकारात्मकता भरलेली आहे. त्यात सकारात्मकता आणणारी संजीवनी आपल्या कृषी विभागाकडेच आहे. शेतकऱ्यांच्या गावात, बांधावर जात मदत, प्रोत्साहन, ज्ञानतंत्रज्ञानाची माहिती देणे हीच ती खरी संजीवनी आहे.’’

‘‘तुम्ही बीएस्सी, एमएस्सी झालेला आहात. ते ज्ञान घेण्यासाठी शेतकरी वाट बघत आहेत. त्यासाठी तुम्हाला बांधाबांधावर जावे लागेल. तसे झाले तर शेती उन्नत आणि शेतकरी सुखी होतील,” असे मत आयुक्तांनी व्यक्त केले. कृषी दिनानिमित्ताने प्रवेशद्वाराजवळ निवृत्त कृषी कर्मचारी रमेश श्रीपाद यांनी सुंदर रांगोळी रेखाटली होती. बचत गटांच्या शेतकरी महिलांनी आपली विविध उत्पादने मांडली होती. आयुक्तांनी या उत्पादनांची पाहणी केली व शेतकऱ्यांना बियाण्यांचेही वाटप केले.

नव्या सरकारचे प्राधान्य कृषी क्षेत्राला
आधीच्या मुख्यमंत्र्यांनी ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून कृषी विभागाला उपक्रमशील केले. आता नव्या सरकारनेही कृषी क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत राज्यातील खरीप पेरण्यांचा आढावा घेण्यात आला. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या. यामुळे कृषी क्षेत्राचे महत्त्व अजिबात कमी होणार नाही, असे या वेळी सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com