संत तुकाराम महाराज पालखीचे २० जूनपासून प्रस्थान

संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांची माहिती
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
संत तुकाराम महाराज पालखी सोहळाAgrowon

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे वारकऱ्यांना जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पायी वारी सोहळा अनुभवता आला नाही. मात्र, यंदा हा वैष्णवांना पालखी सोहळा अनुभवता येणार आहे. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३३७ व्या पालखी सोहळ्याला श्री क्षेत्र देहूगाव येथून ज्येष्ठ वद्य सप्तमी सोमवारी (ता. २०) प्रस्थानाने प्रारंभ होणार आहे. २३ जूनला पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी तर नऊ जुलैला पंढरपूरला पोहचणार आहे, अशी माहिती श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे यांनी दिली.

यंदा हा पालखी सोहळा १३ जुलैला परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार असून सोहळ्याची सांगता २४ जुलैला देहूच्या मुख्य मंदिरात समारोप होणार आहे. तुकोबारायांचा पालखी सोहळा पायी वारी होत आहे. पालखी मार्गावर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने थोडाफार वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.

संस्थानने पालखी सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी (ता. ८) जाहीर केला. पालखी सोहळ्याच्या तयारीला प्रारंभ करण्यात आला आहे. नैमित्तिक कामे संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आली आहेत. परंपरेनुसार यंदा पालखी सोहळा पंढरपूर मार्गस्थ होत असताना पुणे येथील नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात दोन मुक्काम होतील. तर इंदापूर येथे पालखी तळावर दोन दिवस मुक्काम होणार आहे. प्रत्येक ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले तर इंदापूरनंतर सराटी येथील अकलूज माने विद्यालयाजवळ गोल रिंगण होणार आहे. माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोडले येथे धावा तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरी येथे पादुका आरती येथे उभे रिंगण होईल, असेही हभप मोरे यांनी सांगितले.

असा आहे पालखी सोहळ्याचा मार्ग व नियोजन

  • २० जून -- देहूतील मुख्य मंदिरात पालखी प्रस्थान, पहिला मुक्काम श्री क्षेत्र देहूगाव येथील इनामदार साहेब वाड्यात

  • २१ जून -- आकुर्डी विठ्ठल मंदिर

  • २२ व २३ जून -- श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नाना पेठ, पुणे

  • २४ जून -- लोणी काळभोर

  • २५ जून -- वरवंड

  • २७ जून -- उंडवडी

  • २८ जून -- बारामती शारदा विद्यालय

  • २९ जून -- सणसर (पालखी तळ)

  • ३० जून -- दुपारचे बेलवडी गोल रिंगण, नंतर आंथुर्णे (पालखी सोहळा)

  • १ जुलै -- निमगाव केतकी (पालखी तळ)

  • २ जुलै -- इंदापूर येथे गोल रिंगण, दोन दिवस मुक्काम

  • ४ जुलै -- सराटी ५ जुलै अकलूज (माने विद्यालय येथे गोल रिंगण)

  • ६ जुलै -- माळीनगर येथे उभे रिंगण बोरगाव

  • ७ जुलै -- तोंडले बोंडले येथे धावा, पिराची कुरोली मुक्काम

  • ८ जुलै -- बाजीराव विहीर येथे उभे रिंगण, वाखरी येथे मुक्काम

  • ९ जुलै -- पादुका आरती येथे उभे रिंगण झाल्यावर पंढरपूरकडे प्रस्थान, रात्री पंढरपूर येथे श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी विसावणार आहे.

  • १० जुलै -- नगर प्रदक्षिणा करून पालखी १३ जुलै दुपारी एक वाजेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे.

  • १३ जुलै -- दुपारी परतीच्या प्रवासाला सुरुवात

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com