अजय चौधरी यांच्या नियुक्तीला विधानसभा उपाध्यक्षांची मान्यता

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मात्र शिवसेनेचे गटनेते म्हणून अजय चौधरी यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. या निर्णयाला शिंदे गटाकडून उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.
Ajay Chaudhary & Eknath Shinde
Ajay Chaudhary & Eknath ShindeAgrowon

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून बहुमताचा दावा केला जात असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मात्र शिवसेनेचे गटनेते म्हणून अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. या निर्णयाला शिंदे गटाकडून उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्ष नेतेपदावरून हटवून अजय चौधरी यांची गटनेतेपदावर नियुक्ती केली. शिंदे गटाने मात्र ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते.

तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच गटनेते असल्याचे या गटाने जाहीर केले होते. तसेच शिंदे गटाने आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करत शिवसेनेच्या ३७ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र गुरूवारी (२३ जून) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh Koshyari) आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे दिल्याचे सांगण्यात येत होते. तशा बातम्या माध्यमांत प्रसिध्द झाल्या होत्या. मात्र याविषयी संभ्रम कायम आहे. कारण आज हे पत्र राज्यपाल आणि विधानसभा उपाध्यक्षांना दिले जाईल, अशी ताजी माहिती आली आहे. दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज (ता. २४) अजय चौधरी यांच्या गटनेतेपदावरील नियुक्तीस मान्यता दिली. त्यामुळे आता या प्रकरणी कायदेशीर लढाई रंगणार आहे.

रस्त्यावरच्या लढाईतही आम्हीच जिंकणार : राऊतांचे शिंदेंना ओपन चॅलेंज

दरम्यान हार नही मानेंगे, आता आमची वेळ आहे. महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे. पुढची अडीच वर्ष आमचे सरकार पूर्ण करणार असल्याचा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला. दिलेली वेळ निघून गेली आहे. लढाई रस्त्यावर झाली तरीही आम्हीच जिंकू, असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले.

आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांच्याशी चर्चा केली. आम्ही पूर्ण तयारी केली. महाविकास आघाडी मजबूत आहे. आमचे सरकार पुढील अडीच वर्ष पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल, असेही राऊत म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com