Ramdas Athawale : रामदास आठवले यांना पुन्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे वेध

शिर्डी लोकसभा मतदार संघातून एकदा पराभूत झालेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा शिर्डीतून या वेळी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Ramdas Athawale
Ramdas Athawale Agrowon

Nagar News : शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha Constituency) मतदार संघातून एकदा पराभूत झालेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पुन्हा शिर्डीतून या वेळी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रविवारी (ता. १२) त्यांनी शिर्डीत भेट दिली.

त्या वेळी पत्रकारांशी बोलाताना त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. सध्या येथे शिवसेनेचे खासदार आहेत; मात्र सत्तातंरानंतर त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे. त्यामुळे आठवले यांची इच्छा त्यांचे टेन्शन वाढविणारी आहे.

केंद्रीय मंत्री आठवले यांनी रविवारी शिर्डीला भेट दिली. या वेळी ते म्हणाले, की राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे काम व्यवस्थित सुरू आहे.

ते आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. त्यामुळे हे सरकार पडणार, ही अफवाच आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली इच्छा आहे.

Ramdas Athawale
Onion Subsidy : कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

‘आरपीआय’चे (आठवले गट) राष्ट्रीय अधिवेशन लवकरच शिर्डीत होणार असून, त्यासाठी मुख्यमंत्री व विविध मंत्री, नेते उपस्थित राहणार आहेत. ‘आरपीआय’चे नागालँडसारख्या प्रदेशात आमदार निवडून येतात, मग महाराष्ट्रात का निवडून येऊ शकत नाहीत, यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांचे विचारमंथन या अधिवेशनात होणार आहे.

Ramdas Athawale
Ajit Pawar : बाजार समितीतील गैरकारभाराचे अजित पवारांनी काढले वाभाडे

त्याचप्रमाणे केंद्र सरकारमध्ये एक मंत्रिपदावर असमाधानी असून, पक्षातील इतरांनाही संधी मिळावी. राज्यात दोन-तीन महामंडळे पक्षाच्या नेत्यांना मिळावीत. मंत्रिमंडळ विस्तार राज्यात लवकर व्हावा. ‘आरपीआय’ला एक मंत्रिपद दिले जावे.

राज्यपाल नियुक्त आमदारांत ‘आरपीआय’ला एक जागा मिळावी, असा प्रस्ताव आपण सरकारपुढे ठेवला असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला तीन जागा आणि विधानसभेत १५ जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे. यासाठी आमची भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे, असे आठवले म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com