Ujani Dam : उजनी धरण होऊनही सीमावर्ती भाग तहानलेलाच

उजनी धरणावरून एकूण ११ उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहेत. परंतु, सीना-माढा व भीमा-सीना जोडकालवा वगळता उर्वरित योजना (शिरापूर, आष्टी, बार्शी, एकरूख, सांगोला, मंगळवेढा, दहिगाव, देगाव योजना) अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत, हे विशेष.
Ujani Dam
Ujani Dam Agrowon

सोलापूर : जिल्ह्यातील दुष्काळ (Drought) कायमचा दूर व्हावा म्हणून जून १९८० पासून ‘उजनी’त पाणी साठा (Ujani Water Storage) होऊ लागला. जिल्ह्यातील साडेआठ लाख हेक्टरपैकी पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली (Land Under Irrigation) आले. परंतु, कर्नाटकाच्या सीमेवरील अक्कलकोटमधील एकाही गावात उजनीचे पाणी (Ujani Water) मागील ४२ वर्षांत थेटपणे पोचलेले नाही. दुसरीकडे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३० टक्केच क्षेत्र धरणातील पाण्यातून भिजते. याच संधीचा फायदा कर्नाटक सरकार घेत असल्याची बाब समोर आली आहे.

Ujani Dam
Agriculture Irrigation : उजनीतून शेतीसाठी २० जानेवारीनंतर पाणी

उजनी धरणावरून एकूण ११ उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहेत. परंतु, सीना-माढा व भीमा-सीना जोडकालवा वगळता उर्वरित योजना (शिरापूर, आष्टी, बार्शी, एकरूख, सांगोला, मंगळवेढा, दहिगाव, देगाव योजना) अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत, हे विशेष. दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील नऊ हजार हेक्टर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील जवळपास चार हजार हेक्टर क्षेत्रासाठी महत्त्वाची असलेली देगाव (एकरूख योजना) योजनेचे काम १५ वर्षांपासून अजूनही पूर्ण झालेले नाही.

Ujani Dam
Wheat Irrigation Management : या अवस्थेत गहू पिकाला पाणी देणे गरजेचे

सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील १४ हजार ६८८ हेक्टर एवढ्याच क्षेत्राला उजनीचे पाणी मिळत आहे. दुसरीकडे, अक्कलकोट तालुक्यातील एकाही गावात उजनीचे पाणी पोचलेले नाही. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची देखील दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटलेला असतो, शाळांना सुटी द्यावी लागते, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील २८ गावांतील गावकरी ‘पायाभूत सुविधा तत्काळ करा, नाहीतर कर्नाटकात जाण्यास परवानगी द्या’ अशी मागणी करू लागले आहेत.

दोन लाख हेक्टर क्षेत्राला पाणीच नाही

अक्कलकोटमधील ‘बोरी’ मध्यम प्रकल्पामुळे दोन हजार हेक्टरपर्यंत क्षेत्राला पाणी मिळते. दुसरीकडे, अक्कलकोट तालुक्यातील हंजगी, चिक्केहळ्ळी, शिरवळवाडी, डोंबरजवळगे, बळोरगी, काझीकणबस, बोरगाव व बोरी कवठे या आठ लघू प्रकल्पांतून केवळ दोन हजार ८४९ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळते.

पण, पाऊस कमी झाल्यास हे प्रकल्प कोरडेठाक असतात. दक्षिण सोलापूर तालुक्यातील १४ हजार ६८८ हेक्टर क्षेत्राला उजनीतून पाणी मिळते. बॅरेजेस बांधून पाणी अडवण्याच्या अनेकदा घोषणा झाल्या; पण काहीच झाले नाही. या तालुक्यात होटगी, रामपूर, हणमगाव हे तीन लघू प्रकल्प असून त्यातून केवळ ११८१ हेक्टर क्षेत्र भिजते. दोन्ही तालुक्यातील अंदाजित दोन लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत उजनीचे पाणी मागील ४२ वर्षांत पोचलेले नाही, हे विशेष.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com