नुकसानीचा सविस्तर अहवाल केंद्राला सादर करणार

केंद्रीय पथकाने विभागातील विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन या नुकसानीसंदर्भात पाहणी केली. या संदर्भात गुरुवारी (ता.४) विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हानिहाय नुकसानीचा केंद्रीय पथकाने आढावा घेतला.
Agriculture
Agriculture Agrowon

नागपूर : ‘‘पिकांसह घरे, रस्ते, सिंचन प्रकल्प (Irrigation Project) आदी विविध पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल (Detailed Report Of Damage) तयार करण्यात येणार आहे. केंद्रीय पथकाने नुकसानीसंदर्भात आढावा घेतला आहे. केंद्र शासनाला सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती केंद्रीय पथकाचे प्रमुख राजीव शर्मा यांनी दिली.

केंद्रीय पथकाने विभागातील विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन या नुकसानीसंदर्भात पाहणी केली. या संदर्भात गुरुवारी (ता.४) विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हानिहाय नुकसानीचा केंद्रीय पथकाने आढावा घेतला.

Agriculture
Cotton : पेरा वाढूनही कपाशी बियाणे विक्रीला मर्यादा

या पथकामध्ये नॅशनल इंटेलिजन्स ग्रीडचे सहसचिव राजीव शर्मा, जलशक्ती विभागातील संचालक हरीश उंबरजे, ऊर्जा मंत्रालयाच्या संचालिका मीना हुडा, ग्रामविकास विभागातील संचालक माणिक चंद्र पंडित, वित्त विभागातील उपसचिव रूपकदास तालुकदार, कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभागातील संचालक ए. एल. वाघमारे, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागातील देवेंद्र चापेकर यांचा समावेश होता. मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांशी या वेळी संवाद साधला. विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी विभागात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे सादरीकरण केले. या वेळी विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

Agriculture
Crop Damage: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या

नागपूर विभागात जुलै महिन्यात प्रत्यक्षात ६८४.२२ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीपेक्षा १९० टक्के अधिक पाऊस पडल्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती, सततचा पाऊस यामुळे शेतीपिकांचे, पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाने पूरग्रस्तांना तातडीची मदत दिली आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यानुसार शासनाला अहवाल सादर करण्यात येत असल्याचे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

४ लाख ७७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

विभागातील सहाही जिल्ह्यांतील ६२ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे ५ लाख २५ हजार ७५९ शेतकऱ्यांच्या ४ लाख ७७ हजार ०६४ हेक्टर क्षेत्रांवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर यासह इतर खरीप पिकांचा समावेश आहे. तसेच ५ हजार ४३५ हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोलीतील पिकांची तुलनेने मोठी हानी झाली आहे. तसेच या काळात ७३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १८६ पाणीपुरवठा योजना, रस्ते, आरोग्य सुविधा आदींचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीसाठी केंद्राने तत्काळ मदत करावी
असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव, मदत व पुनर्वसन विभाग.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com