
Gram Panchayat News नाशिक : आपले गाव आदर्श (Ideal Village) बनविण्यासाठी गावकऱ्यांची जिद्द व इच्छाशक्ती महत्त्वाची असून गावाने आपला आदर्श इतरांनाही मागदर्शक कसा ठरेल यादृष्टिने प्रामाणिक प्रयत्न करावेत. पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी (Gram Panchayat Award) भविष्यातही मेहनतीत सातत्य राखावे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत, आरोग्य, प्राथमिक शिक्षण व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या विविध पुरस्कार वितरणप्रसंगी पालकमंत्री भुसे बोलत होते.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, सहायक आयुक्त प्रतिभा संगमनेरे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी यांच्यासह ग्रामपंचायतींचे सदस्य, गटविकास अधिकारी, शिक्षक उपस्थित होते.
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’अंतर्गत ३ महिला स्वयंसहाय्यता समूहांना प्रत्येकी दीड लाख व एका समूहाला तीन लाखांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
नरहरी झिरवाळ यांनी फटकेबाजी करत उपस्थित ग्रामसेवक, सरपंच, सदस्यांना टोले लगावले. गावांना पुरस्कार मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गावात दिसत नाहीत.
त्यासाठी सातत्य ठेवावे, शासनावर अवलंबून राहण्यापेक्षा लोकांना एकत्र करून विकास करा, असे आवाहन त्यांनी केले.
पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती
दरी (नाशिक), शिरसाठे (इगतपुरी), वेळुंजे (त्र्यंबकेश्र्वर), कोपुर्ली बुद्रुत (पेठ), बुबळी (सुरगाणा), सुळे (कळवण), करंजवण (दिंडोरी), पिंपळदर (सटाणा), वरवंडी (देवळा), राजदेरवाडी (चांदवड), भारदेनगर (मालेगाव), बोराळे (नांदगाव), थेरगाव (निफाड), महालखेडा (येवला), वडांगळी (सिन्नर).
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.