किसान सभेचे लोकप्रतिनिधी पाठविण्याचा निर्धार करा : शिंगाडे

अखिल भारतीय किसान सभेच्या जुन्नर तालुका समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन रविवार (ता.७) रोजी प्रभाकर संझगिरी भवन, जुन्नर येथे पार पडले. या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ॲड. शिंगाडे बोलत होते.
Kisan Sabha
Kisan SabhaAgrowon

जुन्नर, जि. पुणे ः ‘‘शेतकरी, कष्टकरी, कामगार व सर्व सामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी तसेच प्रशासकीय पातळीवर मांडण्यासाठी किसान सभेचे लोकप्रतिनिधी पाठविण्याचा निर्धार करा,’’ असे आवाहन किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे यांनी येथे केले.

अखिल भारतीय किसान सभेच्या (All India Kisan Sabha) जुन्नर तालुका समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन रविवार (ता.७) रोजी प्रभाकर संझगिरी भवन, जुन्नर येथे पार पडले. या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ॲड. शिंगाडे (Adv. Shingade) बोलत होते.

शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब लांघी यांनी उद्घाटनप्रसंगी किसान सभेला बळ देण्याचे आवाहन केले. नामदेव मुंढे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रतिनिधी सत्रात मागील तीन वर्षांचा कार्यात्मक, संघटनात्मक अहवाल सादर करण्यात आला. चर्चा व सूचनेनंतर अहवाल मंजूर करण्यात आला.

Kisan Sabha
किसान सभा, आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून देणार गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा

या अधिवेशनात शेतीमालाला हमीभाव देणार कायदा करा, शिक्षण,आरोग्य आणि अन्य स्थानिक प्रश्नांसंदर्भातील लढा तीव्र करा, मनरेगा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, आदिवासी विकास महामंडळामार्फत हिरडा खरेदी करा आदी ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

Kisan Sabha
Agnipath : किसान युनियनकडून 'अग्निपथ'विरोधात आंदोलन

जिल्हाध्यक्ष ॲड. शिंगाडे म्हणाले, ‘‘इको सेन्सेटिव्ह झोनचा मुद्दा किसान सभेने तडीस नेला. पर्यावरण मनरेगा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तीव्र संघर्ष करण्याची गरज आहे. आदिवासी महामंडळाने हिरडा खरेदी करण्यासाठी येणाऱ्या काळात संघर्ष करावा लागेल.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com