अंगणवाड्यांचा विकास लोकसहभागातून करा ः मंत्री लोढा

अंगणवाड्यांचा विकास लोकसहभागातून होण्याच्या दृष्टीने अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) आणि विविध सामाजिक संस्थानी प्राधान्याने पुढे येत लोकसहभागातून अंगणवाड्यांचा विकास साधावा, असे आवाहन पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat LodhaAgrowon

औरंगाबाद: अंगणवाड्यांचा विकास (Anganwadi Development) लोकसहभागातून होण्याच्या दृष्टीने अंगणवाड्या दत्तक (Anganwadi Adoption) घेण्यासाठी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) आणि विविध सामाजिक संस्थानी प्राधान्याने पुढे येत लोकसहभागातून अंगणवाड्यांचा विकास साधावा, असे आवाहन पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी केले.

Mangal Prabhat Lodha
Rural Development : शाश्वत ग्राम विकासाच्या ध्येयाची अंमलबजावणी

रेल्वे स्थानक परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयात महिला व बालविकास या विषयावर आढावा बैठकीत श्री. लोढा बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, सहायक आयुक्त (विकास) विना सुपेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा महिला बालविकास अधिकार प्रमोद इंगोले, बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय कदम, गणेश पुंगळे आदींसह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Mangal Prabhat Lodha
Rural Development : ग्रामपंचायतीसाठी विकासाची नांदी

श्री. लोढा म्हणाले, की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अंगणवाडीतील आरोग्य तपासणी, पायाभूत सुविधा खाद्यपुरवठा आदींसाठी सामाजिक संस्था,सीएसआर निधीच्या माध्यमातून तसेच लोकसहभागातून अंगणवाडीच्या पायाभूत सुविधेकरीता शहरातील किमान २५ टक्के अंगणवाड्या व ग्रामीण भागातील किमान ३० टक्के अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधेकरीता सर्वांनी समन्वयाने काम करावे.

अंगणवाडी पदभरती, इमारत दुरुस्ती बालसुधारगृह, बालगृह, समुपदेशन केंद्र, केंद्राद्वारे राबविण्यात येणारी मिशन शक्ती योजना, उज्ज्वला योजना पोषण महासप्ताह, महिला आर्थिक विकास महामंडळे, शासकीय मुलांचे अनुरक्षण गृह केंद्र, निरीक्षण गृह आदींच्या सोईसुविधेचा आढावा घेत बचतगटाच्या माध्यमातून उत्पादनवाढीसाठी प्रस्ताव तत्काळ पाठविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना श्री लोढा यांनी यावेळी दिल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com