
Cooperative Conference पुणे ः गावस्तरावरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या (Credit Soicety) त्या गावांची आर्थिक विकास केंद्रे आहेत. पण यापुढे केवळ शेतीकर्जे (Agriculture Loan) वाटप करणे, एवढाच उद्देश सोसायट्यांनी ठेवून चालणार नाही.
आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत (Income source) वाढवणे आवश्यक आहे, असे मत सहकार महापरिषदेतील परिसंवादात व्यक्त करण्यात आले.
‘विविध कार्यकारी सोसायट्या’ या विषयातील परिसंवादामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, फेडरेशन सोसायटीचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, गोदावरी अर्बन मल्टिस्टेट सोसायटीचे सरव्यवस्थापक धनंजय तांबेकर सहभागी झाले होते. राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी या परिसंवादाचे संचालन केले.
श्री. कवडे म्हणाले, की आपल्याकडे राज्य बँक, जिल्हा बँक आणि गावस्तरावर विकास सोसायट्यांचे जाळे आहे.
राज्यात २ लाख २० हजारापेक्षा जास्त सहकारी संस्था आहेत. २० हजारांपेक्षा जास्त पतसंस्था आणि तेवढ्याच बँका आहेत.
या चळवळीतील आमचे योगदान मोठे आहे. आज या चळवळीचे सिंहावलोकन करण्याची गरज आहे. त्यासाठी सहकारातील आमची बलस्थाने काय आहेत, त्यातील संधी काय आहेत, त्याचा विचार करणे गरजेचे आहे.
श्री. दुर्गाडे म्हणाले, की विकास सोसायट्या गावाची आर्थिक विकास केंद्रे आहेत. गावस्तरावर जिल्हा बँकेकडून या सोसायट्या कर्जे घेतात, पुढे शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा करतात, शेती किफायतशीर करण्यामध्ये सोसायट्यांचा मोठा हात आहे.
पण सोसायट्यांनी आता केवळ दोन टक्के कमिशन घेऊन कर्जाचे व्यवहार करणे, एवढंच काम करून चालणार नाही. सोसायट्यांनी विविध प्रकारची कामे केली पाहिजेत, त्या पद्धतीचे प्रशिक्षण त्यांना घ्यावे लागेल. दीर्घकालीन, अल्पकालीन आराखडा करावा. तरच सोसायट्या बळकट होतील.
श्री. कोयटे म्हणाले, की विकास सोसायटी अवजारे बँक, कृषी केंद्र यासारखे व्यावसायिक उपक्रम राबवू शकते. पण या सोसायट्यांबरोबर सहकारी पतसंस्थांकडे आर्थिक क्षमता, मनुष्यबळ उत्तम आहे.
त्यांनाही विकास सोसायट्यांप्रमाणे सरकारकडून साह्य मिळायला हवे. आपली सहकार चळवळ दखल घेण्यासारखी आहेच, पण आपल्या तुलनेत नेपाळमधील सहकार चळवळ मोठी आहे.
सभासदांचे, संचालकांचे प्रशिक्षण आवश्यक आहे. नियोजनबद्ध, शिस्तीने कामकाज झाल्यास सहकार चळवळ आणखी वाढेल.
श्री. तांबेकर म्हणाले, की सहकारामध्ये आपले भविष्य उज्वल आहे. मात्र, सहकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. आमच्या गोदावरी सोसायटीचे तीन लाख सभासद आहेत.
यामध्ये एक लाख या महिला आहेत. त्यात ‘सेल्फहेल्प’ माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो.कर्मचाऱ्यांकडून सभासद दत्तक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातात.
अगदी क्युआरकोड, मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग बाबत प्रशिक्षण देत आहोत. या पद्धतीने कामकाज झाले, तर सहकाराच्या विस्ताराला मोठा वाव आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.