Maharashtra Political Crisis:देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंचा आज सात वाजता शपथविधी

नवीन मंत्रमंडळात कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा रंगू लागली आहे. परंतु एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या चर्चेवर व माध्यमांत प्रसिध्द होणाऱ्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीवर विश्वास ठेऊ नका, लवकरच याबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, अशा आशयाचं ट्विट केलं आहे.
Shinde $ Fadanvis
Shinde $ FadanvisAgrowon

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकवणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुरूवारी (ता. ३०) दुपारी गोव्यातून मुंबईत दाखल झाले. त्यांनी सांगर बंगल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आज रात्री सात वाजता राज्याचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. सोबतच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आज या दोघांचाच शपथविधी होणार आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजभवनाकडे रवाना झाले आहेत. ते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. भाजप एकनाथ शिंदे गटातील ३९ शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष ९ अशा ४८ आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे.

शपथविधीसाठी राजभवनात जय्यत तयारी सुरू आहे. शपथविधीनंतर एकनाथ शिंदे परत गोव्याला जाणार आहेत. तिथे बंडखोर आमदारांशी चर्चा करून पुढची रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे. शपथविधीनंतर फडणवीस व शिंदे संयुक्त पत्रकारपरिषद घेण्याची शक्यता आहे.

नवीन मंत्रमंडळात कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा रंगू लागली आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी या चर्चेवर व माध्यमांत प्रसिध्द होणाऱ्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीवर विश्वास ठेऊ नका, लवकरच याबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, अशा आशयाचं ट्विट केलं आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह न करता विधीमंडळात येऊन भूमिका मांडायला हवी होती आणि त्यानंतर राजीनामा द्यायला हवा होता, असं ते म्हणाले. आता उद्धव ठाकरेंमध्ये लढण्याची इच्छा राहिलेली नाही असंही त्यांनी सांगितलं. कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही उध्दव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायला पाहिजे होतं, असं मत व्यक्त केलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com