Kharif Crop Loan : ...तर अशा बँकांवर एफआयआर दाखल करा ; खरीप हंगाम बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस संतापले

Kharif Season 2023 : शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Devendra Fadnvis
Devendra Fadnvis Agrowon

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करा, असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातील आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत बोलताना फडणवीस यांनी हे आदेश दिले आहेत.

राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय खरीप हंगामा आढावा बैठक सध्या सुरू आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध विभागाचे मंत्री, जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जाच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी संताप व्यक्त करत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Devendra Fadnvis
Crop Loan Recovery : शेतकऱ्याची जमाठेव पीककर्जात केली वळती

खरीप हंगामासाठी शेतकरी पीक कर्जासाठी बँकांकडे अर्ज करत आहेत. परंतु सीबीलचा मुद्दा पुढे करत बँका शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारत आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी बैठकीत संताप व्यक्त करत शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Devendra Fadnvis
Crop Loan : जून- 2023 अखेर खरीप पिक कर्ज वाटपाचे करा ; जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बॅंकांना आदेश

बँका जर राज्य सरकारच्या निर्णयाला जुमानत नसतील, तर अशा बँकांवर थेट करण्यात यावी अशी भूमिका फडणवीस यांनी यावेळी मांडली. शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांना झटका दिल्याशिवाय जमणार नाही.

एकतरी एफआयआर दाखल करावा, जेणेकरून अशा बँकांना जरब बसेल, असे आदेशच फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या सीबीलचा मुद्दा चर्चेत आहे. सीबीलचे कारण देत अनेक बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज नाकारले आहे. याच मुद्द्यावरू फडणवीस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही अमरावती येथील खरीप हंगाम आढावा बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सीबीलचे निकष लावून कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचे पैसे परस्पर कर्जाच्या खात्यात वळवल्यासही कारवाई करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com