Madhi Kanifnath Yatra : मढीत कानिफनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

होळी, रंगपंचमी व फुलोरबाग, अशा तीन टप्प्यांत मढी यात्रा भरते. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतल्याने मढी यात्रेचा हा मुख्य दिवस मानला जातो.
kanifnath Yatra
kanifnath YatraAgrowon

Nagar News नगर ः ‘कानिफनाथ महाराज की जय’ अशा घोषणा देत रविवारी (ता. १२) राज्यासह परराज्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी कानिफनाथांच्या (Kanifnath Yatra) संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त समाधीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. आज (सोमवारी) दुसऱ्या दिवशीही भाविकांची दर्शनासाठी ओढा होता. मात्र भाविकांची संख्या कमी होती. (Latest Marathi News)

होळी, रंगपंचमी व फुलोरबाग, अशा तीन टप्प्यांत मढी यात्रा भरते. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतल्याने मढी यात्रेचा हा मुख्य दिवस मानला जातो. मागील दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने भाविकांना नाथांच्या समाधीचे दर्शन घेता आले नव्हते.

kanifnath Yatra
Nadi Samvaad Yatra : नदी संवाद यात्रेदरम्यान ग्रामीण भागात रंगत

मात्र या वर्षी सकाळपासूनच मढीकडे जाणारे सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. देवस्थान समितीने दर्शनासाठी एकेरी बारी केल्याने मुख्य मंदिरात भाविकांची गैरसोय टळली. ठिकठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. नाथांचा प्रसाद म्हणून भाविक रेवड्या नाथांच्या समाधीला वाहत होते.

kanifnath Yatra
Nagar News : नगरला मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी

त्यामुळे रेवड्यांच्या बाजारात मोठी उलाढाल झाली. यात्रेनिमित्त आज मुख्य गाभारा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता, तर आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थान समितीकडून स्वागत करण्यात आले. नगर जिल्ह्यातील सर्वच आगारांतून मढीला जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या.

मढी ते निवडुंगे व तिसगाव येथे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. वाहतूक कोंडीचा फायदा घेत खिसेकापूंचा सुळसुळाट पाहायला मिळाला. अनेकांचे खिसे गर्दीचा फायदा घेत साफ करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com