अनिष्ट रूढी, परंपरा कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव धनगरवाडी ग्रामस्थांकडून मंजूर

धनगरवाडी (ता. जुन्नर) गावाने विधवा महिलांच्या सन्मानासाठी विधवा प्रथाबंदीचा निर्णय घेण्यात आला.
अनिष्ट रूढी, परंपरा कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव धनगरवाडी  ग्रामस्थांकडून मंजूर
Rural DevelopmentAgrowon

ओझर, जि. पुणे ः धनगरवाडी (ता. जुन्नर) गावाने विधवा महिलांच्या सन्मानासाठी विधवा प्रथाबंदीचा (Widow Tradition) निर्णय घेण्यात आला. समाजात प्रचलित असलेल्या विधवा प्रथेचे निर्मूलन करून अनिष्ट रूढी व परंपरा कायमस्वरूपी बंद (Ban Tradition) करण्याबाबतचा ठराव ग्रामस्थांनी एकमुखाने मंजूर केला. या वेळी ग्रामसेविका ऊर्मिला चासकर यांनी ठरावाचे वाचन केले. पुढील काळात अशा प्रथांचे पालन करणार नाही, करू देणार नाही, अशी भूमिका घेतली. सरपंच महेश शेळके व उपसरपंच राजेंद्र शेळके यांनी हा ठराव घेण्यासाठी पुढाकार घेतला. (Rural Development)

या वेळी जुन्नरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला कुचिक, नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुनील धनवे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या बैठकीला गावातील सुमारे २०० महिला उपस्थित होत्या.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पतीच्या निधनानंतर संबंधित महिलेचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, साडीचा पदर कापणे अशा अनिष्ट परंपरा आजही समाजात जोपासल्या जातात. विधवा महिलांना कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. या सर्व प्रथा परंपरांना पायबंद घालण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यानंतर गावातील एका व्यक्तीच्या निधनानंतर सदर ठरावाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे प्रियांका शेळके यांनी सांगितले.

विधवा महिलांना समाजात आजही सन्मानाची वागणूक दिली जात नाही. पतीच्या निधनावेळी अनिष्ट प्रथांचे पालन महिलाच करत असतात म्हणून महिलांनीच या अनिष्ट रूढी व प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

- निर्मला कुचिक,

बालविकास प्रकल्प अधिकारी, जुन्नर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com