Grampanchayat Election : धानोरा, सोमावल बुद्रूक ग्रामपंचायती बिनविरोध

तळोदा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींसाठी अर्जांची माघार
Grampanchayat Election
Grampanchayat ElectionAgrowon

तळोदा, जि.नंदुरबार : तळोदा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींसाठी (Taloda Grampanchayat) अर्जांची माघार व चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, तालुक्यातील धानोरा व सोमावल बुद्रूक या दोन ग्रामपंचायती सरपंच, सदस्यांसह बिनविरोध झाल्या आहेत. तर मोरवड व चौगाव बुद्रूक या दोन ग्रामपंचायतींमध्ये सरपंच बिनविरोध झाले असून, सदस्यांसाठी निवडणूक (Taloda Election) होणार आहे.

Grampanchayat Election
APMC Election : ‘शेतकऱ्यांना मतदाना’वरून भाजपमध्येच दोन मतप्रवाह

तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींपैकी आता ५१ ठिकाणी सरपंचपदासाठी निवडणूक रंगणार आहे. येत्या १६ ऑक्टोबरला मतदान होणार असून, १७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायतीत सरपंचपदाची निवड थेट मतदारांतून होणार असल्याने यावेळी तळोदा तालुक्यात अनेक ठिकाणी चुरस दिसून येत आहे.

Grampanchayat Election
APMC Election : बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा

तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी २७८ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील ७९ जणांनी माघार घेतली. निवडणूक प्रक्रियेत सरपंच पदासाठी तरुणांचा सक्रिय सहभाग अधिक असल्याने

Grampanchayat Election
APMC Election : ‘शेतकऱ्यांना मतदाना’वरून भाजपमध्येच दोन मतप्रवाह

सदस्य पदापेक्षा सरपंच पदाच्या निवडीसाठी तरुण निवडणूक रिंगणात असल्याने चुरस दिसून येत आहे. ५५ ग्रामपंचायतीमधील सदस्यांसाठी ११८६ इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यातील १७८ इच्छुकांनी माघार घेतल्याने ७४ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

त्यामुळे आता सदस्यांच्या जागांसाठी ९३४ इच्छुक उमेदवार रिंगणात असणार आहेत. आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील मोरवड, धानोरा, सोमावल बुद्रूक व चौगाव बुद्रूक या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

गावातील सामाजिक सलोखा कायम राहावा, एकजुटीने गाव विकासाला चालना मिळावी या उद्देशाने ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीवर भर होता. तालुक्यातील ५५ पैकी ४ ठिकाणी सरपंच बिनविरोध झाले आहेत. उर्वरित ५१ पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भाजपला यश मिळेल असा विश्वास आहे.

- राजेश पाडवी, आमदार , तळोदा - शहादा, जि.नंदुरबार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com