Salam Kisan: धनश्री मानधनी यांचा `सलाम किसान`च्या माध्यमातून अभिनव उपक्रम

जालना येथील मानधनी कुटुंबातील धनश्री ही तरुणी वीस वर्षाची असून ती अमेरिकेत शिक्षणासाठी गेली. तिला सुरुवातीपासूनच शेती क्षेत्राची आवड होती त्यामुळे अमेरिकेत गेल्यानंतरही तिने शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळी सेवा देण्याच्या संकल्पनेवर काम सुरू केले.
Salam Kisan
Salam KisanAgrowon

जालना येथील मानधनी कुटुंबातील धनश्री (Dhanshree Mandhani) ही तरुणी वीस वर्षाची असून ती अमेरिकेत शिक्षणासाठी गेली. तिला सुरुवातीपासूनच शेती क्षेत्राची (Agriculture Sector) आवड होती त्यामुळे अमेरिकेत गेल्यानंतरही तिने शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळी सेवा देण्याच्या संकल्पनेवर काम सुरू केले.

Salam Kisan
Salam Kisan: गावात रोजगारनिर्मितीसाठी ‘सलाम किसान'चा हातभार

सतत येणाऱ्या संकटामुळे शेती (Agriculture crisis) हा तोट्याचा व्यवसाय समजला जातो. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांची मुलं नोकरी किंवा अन्य व्यवसायाला प्राधान्य देत आहेत.

या बिकट परिस्थितीतही काही जण शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करुन यशस्वी होत आहेत.

या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना उपयुक्त माहिती वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे असते. धनश्री मानधनी या तरूणीने त्यासाठी काम सुरू केले.

अमेरिकेसारखी श्रीमंती आपल्या भारतात का नाही? अमेरिकेसारखे प्रगतशील शेतकरी आपल्या भारतात का नाही? एकंदरीत आपल्या भारतातील शेतकऱ्यांना शेती करून समाधानकारक पैसा का मिळत नाही? भारतातील शेतकरी चुकतो तरी कुठे ? या प्रश्नांवर धनश्रीने अनेक दिवस अभ्यास केला.

शेती हा विषय खूप मोठा आणि गुंतागुंतीचा आहे. वातावरणातील बदल (climate change), कृत्रिम बुध्दिमत्ता (artificial intelligence) या क्षेत्रांत अनेक बदल घडत आहेत. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माहितीच्या गरजा बदलत आहेत.

Salam Kisan
Salam Kisan: प्रगतिशील शेतकऱ्यांना ‘सलाम किसान'ची साथ

या पार्श्वभूमीवर धनश्री मानधनी यांनी सलाम किसान हे व्यासपीठ शेतकऱ्यांसाठी विकसित करण्याचा संकल्प केला. शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालून शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा त्यामागचा हेतू आहे.

‘सलाम किसान' हे एक सुपरॲप असून त्या माध्यमातून शेती मूल्यसाखळीतील सर्व घटकांना ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन' पुरवण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे.

त्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली जाते. प्रामुख्याने पिकांची दिनदर्शिका, कोणत्या वातावरणात ,कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे, केव्हा व कोणत्या औषधांची फवारणी करावी यासंबंधीचा सल्ला, माती परीक्षण, शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेपर्यंत वेळेत पोहोचवणे, ड्रोन फवारणी, शेतकऱ्यांच्या शेतमालाची नासाडी न होऊ देता योग्य भाव मिळेपर्यंत टिकवून ठेवणे या सेवा शेतकऱ्याना पुरवल्या जातात.

धनश्री मानधनी या ‘सलाम किसान'च्या संस्थापक आहेत. प्रद्युमन मानधनी हे कंपनीचे संचालक आहेत तर अक्षय खोब्रागडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com