Farmers Movement : शेतकरीप्रश्नी किसान सभेचे विभागीय आयुक्तालयासमोर धरणे

शेतकऱ्याच्या शेतमजूर, निराधार महिला-पुरुष, आदिवासी, दलित, महिला, भटके-विमुक्तांचे विविध प्रश्न, विविध मागण्या सोडवण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या वतीने बेमुदत धरणेआंदोलन बुधवारी (ता. २३) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आले.
Farmers Movement
Farmers MovementAgrowon

पुणे : शेतकऱ्याच्या शेतमजूर, निराधार महिला-पुरुष, आदिवासी, दलित, महिला, भटके-विमुक्तांचे विविध प्रश्न, विविध मागण्या सोडवण्यासाठी आणि शासनाचे (Government) लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीने बेमुदत धरणे आंदोलन बुधवारी (ता. २३) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आले.

Farmers Movement
Farmer Producer Company: शेतकऱ्यांपर्यंत कमी खर्चाचे तंत्र पोहोचवा ः झेंडे

आंदोलनात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अमोल वाघमारे, अॅड. नाथा शिंगाडे, संतोष कांबळे, दत्तोबा बर्डे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. आदिवासी विकास महामंडळाला बाळहिरडा खरेदी करण्यासाठी आवश्यक तो निधी तत्काळ उपलब्ध करून देऊन तातडीने बाळहिरडा खरेदी केंद्रे तालुका निहाय सुरू करावी. हिरड्याची झाडे सातबारा उताऱ्यावर नोंद व्हावी यासाठी विशेष मोहीम राबवावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

किसान सभेच्या मागण्या...

- ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा

- शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये अनुदान द्या

- आदिवासी, कातकरी, भिल्ल ठाकर आणि भटके विमुक्त समाजाच्या वस्त्यांना पक्के रस्ते मिळावेत

- या समुदायाला विविध शासकीय ओळखपत्रे आणि रेशनकार्ड मिळवीत.

- ठाकर समुदायाला जातीचे दाखले मिळावेत.

- वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी.

Farmers Movement
Farmer Producer Company: शेतकऱ्यांपर्यंत कमी खर्चाचे तंत्र पोहोचवा ः झेंडे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com