धुळे जिल्हा नियोजन समिती निवडणूक वाद न्यायालयात

अनुसूचित जमातीसाठी एकही जागा राखीव नसल्याच्या कारणावरून ‘बाळासाहेबांची शिवसेना’च्या साक्री मतदार संघाच्या आमदार मंजुळा गावित यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीला शासनाकडून स्थगिती मिळविली.
धुळे जिल्हा नियोजन समिती निवडणूक वाद न्यायालयात

धुळे ः अनुसूचित जमातीसाठी एकही जागा राखीव नसल्याच्या कारणावरून ‘बाळासाहेबांची शिवसेना’च्या साक्री मतदार संघाच्या आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीला (Election) शासनाकडून स्थगिती मिळविली. या निर्णयाला भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्यावरील निकालाची जिल्हा परिषद सदस्यांना प्रतीक्षा आहे.

धुळे जिल्हा नियोजन समिती निवडणूक वाद न्यायालयात
Crop Insurance : आदित्य ठाकरे यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

जिल्हा नियोजन समितीची निवडणूक २०१९-२०२० मध्ये अपेक्षित होती. मात्र यानंतर दोन वर्षांचा कालावधी उलटल्यावरही निवडणूक झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे तत्कालीन कृषी सभापती संग्राम पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर यंदा ४ एप्रिलला झालेल्या अंतिम सुनावणीत आठ आठवड्यांत निवडणूक घेण्याचा आदेश खंडपीठाने जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार २१ सप्टेंबरला निवडणूक जाहीर झाल

जिल्हा नियोजन समितीवर ३२ सदस्यांची निवड अपेक्षित होती. त्यासाठी जिल्हा परिषदचे ५६, महापालिकेचे ७४, साक्री नगरपंचायतीचे १७ व शिंदखेडा नगरपंचायतीचे १८ असे एकूण १६५ सदस्य मतदार नोंदले गेले.

धुळे जिल्हा नियोजन समिती निवडणूक वाद न्यायालयात
Rabbi Sowing : रब्बी पेरणी का पडतेय लांबणीवर ? | ॲग्रोवन

यातही ग्रामीण क्षेत्राच्या २२, संक्रमणकालीन क्षेत्र अर्थात साक्री व शिंदखेडा नगर परिषदेसाठी एक, शिरपूर व दोंडाईचा पालिकेसाठी दोन आणि महापालिका क्षेत्रासाठी सात जागा निर्धारित आहेत; परंतु शिरपूर व दोंडाईचा पालिकेवर प्रशासक असल्याने त्यांचा निवडणुकीत सहभाग होऊ शकला नाही.

तसेच जिल्हा परिषदेच्या ओबीसी संवर्गाच्या सात जागांचा प्रश्‍न कायम असल्याने २२ पैकी एकूण १५ जागा रिंगणात होत्या. त्यामुळे अशा नऊ जागा वगळता जिल्हा नियोजन समितीच्या रिंगणात २३ जागा उरल्या.

चुरशीच्या साक्री, शिंदखेडा नगरपंचायत मतदार संघात एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात, उर्वरित २२ जागा बिनविरोध झाल्या. एका जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडण्याची तयारी सुरू असताना आमदार गावित यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीस नियोजन मंत्रालयाने स्थगिती दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com