Weather Update : दिवस, रात्रीच्या तापमानात ११ ते २१ अंशांची तफावत

राज्याच्या अनेक भागांत पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका अनुभवायला मिळत आहे. कमाल, किमान तापमानात चढ- उतार सुरू असतानाच, तापमानातील तफावत वाढली आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon


पुणे : राज्याच्या अनेक भागांत पहाटे गारठा (Cold) आणि दुपारी उन्हाचा चटका अनुभवायला मिळत आहे. कमाल, किमान तापमानात चढ- उतार सुरू असतानाच, तापमानातील तफावत वाढली आहे. रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानात ११ ते २१ अंशांची तफावत दिसून येत आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापासून मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची, तर रत्नागिरी येथे सर्वाधिक ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी (ता. ८) दुपारनंतर राज्याच्या अनेक भागांत ढग जमा झाल्याचे दिसून आले. बुधवारी (ता. ९) राज्याच्या उत्तर भागात अंशतः ढगाळ हवामान होते.
राज्यात अद्याप कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. राज्यात पहाटे गारठा, धुके आणि दव पडत आहे. दुपारी उन्हाचा चटका कायम आहे. राज्याचे किमान तापमान ११ ते २२ अंशांच्या दरम्यान, तर कमाल तापमान ३१ ते ३५ अंशांच्या आसपास आहे. आज (ता. १०) राज्यात कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


Weather Update
ढगाळ हवामानासह दिवस, रात्रीच्या तापमानात घट


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागर आणि लगतच्या विषुववृत्तीय समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुधवारी (ता. ९) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापर्यंत (ता. ११) ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, शनिवारपर्यंत (ता. १२) तमिळनाडू आणि पद्दूचेरीच्या किनारपट्टीकडे येण्याचे संकेत आहेत.  
 

Weather Update
संपूर्ण देश पुढील २१ दिवस ‘लॉकडाउन’


बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२ (१५.८), नगर ३२.४ (-), जळगाव ३४ (१९.४), धुळे ३३.५ (१२.२), कोल्हापूर ३२.१ (१८.७), महाबळेश्‍वर २६.७(१५.०), नाशिक ३१.३ (१४.४), निफाड ३२.२ (११.६), सांगली ३१.९ (१७.२), सातारा ३०.४(१५.८), सोलापूर ३४.२ (१७.७), सांताक्रूझ ३५ (२१.४), डहाणू ३२.१ (१९.५), रत्नागिरी ३५ (२१.४), औरंगाबाद ३१.७ (१५.२), नांदेड ३३.४ (१७), उस्मानाबाद ३२.४ (१५), परभणी ३२.१ (१५.९), अकोला ३४.३ (१७.८), अमरावती ३५.४ (१५.१), बुलडाणा ३१.७ (१७.४), ब्रह्मपुरी - (१७.३), चंद्रपूर ३०.८ (१८.२), गडचिरोली ३१ (१७), गोंदिया ३२.४ (१५.५), नागपूर ३२.६ (१५.९), वर्धा ३१.५ (१६), वाशीम ३४ (१६.२), यवतमाळ ३३ (१५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com