Agriculture Department : नाव ‘आपले सरकार’ आणि वागणूक ‘परक्या’सारखी!

निविष्ठा विक्रेत्यांच्या सोयीसाठी ‘आपले सरकार’ संकेतस्थळाच्या माध्यमातून कृषी विभागाचे परवाने देण्याचा चांगला उपक्रम राज्य सरकारने सुरू केला आहे.
Maharashtra Government
Maharashtra Government Agrowon

Pune News : निविष्ठा विक्रेत्यांच्या (Agriculture Input Sellers) सोयीसाठी ‘आपले सरकार’ संकेतस्थळाच्या (Aaple Sarkar Portal) माध्यमातून कृषी विभागाचे (Agriculture Department) परवाने देण्याचा चांगला उपक्रम राज्य सरकारने सुरू केला आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संकेतस्थळावरील सेवांमध्ये येणारे अडथळे दूर केले जात नसल्याने विक्रेते त्रस्त झाले आहेत.

कृषी विभागाने जिल्हास्तरावरील बियाणे व खते परवाना प्रणालीत बदल केले. त्यामुळे जुनी प्रणाली ६ डिसेंबर २०२१ मध्ये बंद करण्यात आली. नव्या प्रणालीत गेल्या वर्षापासून कामे सुरू आहे.

विक्रेत्यांना परवान्याचे नूतनीकरण (रिन्युअल) आणि सुधारणा (अॅमेन्डमेंट) अशा दोन्ही सुविधा ऑनलाइन देणारी ही प्रणाली महाआयटीमार्फत तयार करण्यात आली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, नव्या प्रणालीतूनच नवे परवाने घेण्याची सक्ती गेल्या फेब्रुवारीपासून केली जात आहे. परंतु त्यात वारंवार उद्‌भवणारे अडथळे दूर केले जात नाही.

Maharashtra Government
Agriculture Department : शिवारातले कृषी कर्मचारी परीक्षा केंद्रात नेमणुकीस

राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांना परवाना काढण्यासाठी थेट ई-परवाना संकेतस्थळावर जाता येत नाही. त्यासाठी आधी ‘आपले सरकार’ उपक्रमाच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en संकेतस्थळावर जावे लागते.

तेथे नाव नोंदणी करून यूझर नेम व पासवर्ड घ्यावा लागतो. त्यानंतर ‘आपले सरकार’च्याच संकेतस्थळावरील ‘कृषी सेवा’ टॅबवर यावे लागते. तेथे ‘अॅग्रिकल्चर लायसनिंग’मध्ये आल्यानंतर शेवटी https://mahaparwana.mahait.org/ हे नवे संकेतस्थळ उघडते.

Maharashtra Government
Agriculture Department : कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, या संकेतस्थळावर परवान्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात केल्यानंतर चौथ्या क्रमांकाच्या टप्प्यावर ‘स्टोअरेज पॉइंट’ सेव्ह करताच पाचवा टप्पा येत नाही.

या टप्प्यात तयार होणारे ‘ऑनलाइन प्रिन्सिपल’ आता मिळत नसल्याचे राज्यातील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ‘‘२८ फेब्रुवारीपासून ही समस्या वारंवार उद्‌भवते आहे.

या बाबत विक्रेत्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधले. तसेच पुण्याच्या कृषी आयुक्तालयात देखील कळविले. टोल फ्री क्रमांकावर व मोबाईलवर तक्रारी केल्यानंतर देखील समस्या सुटलेली नाही,’’ अशी माहिती एका विक्रेत्याने दिली.

राजपत्रातील गाव झाले गायब

ई-परवाना प्रणालीत आधी तळेगाव हे गाव जालन्याच्या भोकरदन तालुक्यात होते. राज्य शासनाचे उपसचिव कि. पां. वडते यांनी ४ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात हे गाव छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात समाविष्ट केले. परंतु परवाना काढण्यासाठी हे गाव संकेतस्थळावर आता कुठेही दिसत नसल्याने विक्रेते हैराण झालेले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com