Bamboo Cultivation : आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर

आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक प्रताप मादीरेड्डी यांनी मंगळवारी (ता. ३१) खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली.
Kharpudi KVK
Kharpudi KVKAgrowon

जालना : आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक प्रताप मादीरेड्डी (Pratap Madireddy) यांनी मंगळवारी (ता. ३१) खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रास (Kharpudi KVK) भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली.

Kharpudi KVK
KVK : ‘केव्हीके’त शास्त्रीय सल्लागार समितीची सभा

शेतीविषयक माहिती घेण्याच्या दृष्टीने आलेल्या मादीरेड्डी यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील बांबू लागवड (Bamboo Cultivation), पोषण बाग, रोपवाटिका, भाजीपाला लागवड (Vegetable Cultivation), शेळीपालन, कुक्कुटपालन, गोपालन, अंडी उबवणी केंद्र, शेततळी, फळबाग प्रक्षेत्र, सीड हब प्रकल्प इत्यादी उपक्रमांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती जाणून घेतली.

Kharpudi KVK
KVK, Kharpudi : काढणी पश्चात तंत्रज्ञान, मूल्यवर्धनावर देणार भर

तसेच कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांशी चर्चा केली. कृषी विज्ञान केंद्राचे उल्लेखनीय उपक्रम कृषी विज्ञान मंडळ, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, बांबू लागवड, रेशीम उद्योग, महिला सक्षमीकरण इत्यादी उपक्रमांचे पोलिस महासंचालकांनी कौतुक केले.

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी पोलिस महासंचालकांचे स्वागत केले. या प्रसंगी मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्‍वस्त कृषिभूषण भगवानराव काळे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com