Yavatmal DCC Bank : जिल्हा बँक संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक तथा कंत्राटदार राजीव मल्लारेड्डी येल्टिवार व शाखा व्यवस्थापक यांनी संगनमताने १८ लाख रुपयांची बनावट एफडीआर तयार करून बँक व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची फसवणूक केली होती.
Yavatmal ZP
Yavatmal ZPagrowon

वणी, यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (District Central Cooperative Bank) संचालक तथा कंत्राटदार राजीव मल्लारेड्डी येल्टिवार व शाखा व्यवस्थापक (Manager) यांनी संगनमताने १८ लाख रुपयांची बनावट एफडीआर तयार करून बँक व जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) बांधकाम विभागाची फसवणूक केली होती.

Yavatmal ZP
Nashik ZP : निधी नियोजन बैठकीत विभागप्रमुखांची झाडाझडती

याप्रकरणी विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ७८ अ (ब) नुसार नोटीस बजावली आहे. पंधरा दिवसांच्या आत म्हणणे मांडावे व खुलासा समाधानकारक नसल्यास कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आल्याने बँक संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाटण शाखेत बँकेचे संचालक येल्टिवार व शाखा व्यवस्थापक यांनी संगनमताने १८ लाख दहा हजार रुपयांची बनावट संकल्प मुदत ठेवी योजनेच्या पावत्या १६ फेब्रुवारी २०२२ रोजी बनवून बँकेची व जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग क्रमांक एकची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी राज्यविधी मंडळात लक्षवेधी दाखल केली होती.

Yavatmal ZP
ZP Recruitment : जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा

सहकारमंत्र्यांनी लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना शाखा व्यवस्थापकावर कारवाई केल्याचे सांगितले. शिवाय विशेष लेखा परीक्षा वर्गाकडून चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. प्राप्त अहवालानुसार अमरावतीचे विभागीय सहनिबंधक राजेंद्र दाभेराव यांनी बँक संचालक येल्टिवार यांना १८ नोव्हेंबरला सुनावणी नोटीस बजावली आहे.

बँक संचालकाला पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये संगनमताने बनावट एफडीआर तयार केले व बँकेमध्ये आर्थिक अफरातफर करण्यामध्ये आपला सहभाग असल्याचे स्पष्ट केले. शिवाय संस्थेच्या हितास बाधा आणली असून, आपल्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हासुद्धा नोंदविल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

एफडीआर फसवणूकप्रकरणी विभागीय सहनिबंधक यांच्यासमक्ष नोटीस प्राप्त झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत म्हणणे मांडावे लागणार आहे. खुलासा मुदतीत न आल्यास अथवा सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्यास उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशित करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com