Education : स्थलांतराने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खोळंबा

मेळघाटात सध्या रोजगाराची कामे नसल्याने आदिवासी बांधव कामाच्या शोधात मेळघाटाबाहेर स्थलांतर करीत आहेत. स्थलांतरामुळे मात्र मुलांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
Migration
MigrationAgrowon

चिखलदरा, अमरावती : मेळघाटात सध्या रोजगाराची कामे नसल्याने आदिवासी बांधव (Tribal People) कामाच्या शोधात मेळघाटाबाहेर (Melghat) स्थलांतर करीत आहेत. स्थलांतरामुळे मात्र मुलांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. गावे रिकामी होत असल्याने शाळासुद्धा ओसाड पडण्याचा धोका आहे.

Migration
Tribal Governance : पेसा ग्रामसभेमार्फत आदिवासींचे स्वशासन

मेळघाटात सद्यःस्थितीत शेतीची कामे संपली आहेत. अशा परिस्थितीत स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नसल्याने आदिवासी बांधव स्थलांतर करीत आहेत. सोयाबीन कापण्यासाठी मजुरांचे स्थलांतर होत असून, हे मजूर अमरावती, अकोला, दर्यापूरसह महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या विविध भागांत रोजगाराच्या शोधात जात आहेत.

त्यांच्यासोबत शाळकरी मुलेसुद्धा असल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे. सोबतच स्थलांतरित कुटुंबांच्या आरोग्याचा व त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नसुद्धा आहे. त्यामुळे शासनाने रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.

पथ्रोट गावानजीकच्या कुंभी वाघोलीमधील सीताफळ वन यावर्षी चांगलेच बहरल्याने वनहक्क समितीच्या सदस्यांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.

२३ हजारांवर विद्यार्थी

मेळघाटातील मजूर सोयाबीनच्या कापणीपासून तर हरभऱ्याच्या कापणीपर्यंत मेळघाटाबाहेर स्थलांतरित होतात. चिखलदरा तालुक्यात २१८ शाळा असून २३ हजारांच्या जवळपास विद्यार्थी आहेत. यातील किती विद्यार्थी स्थलांतरित झाले, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com