Finolex Plasson : शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत फिनोलेक्स प्लासॉन

अलीकडच्या काळात शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एका विशिष्ट संकल्पनेने सामुदायिक शेती विकसित होत आहे. या उपक्रमात फिनोलेक्स प्लासॉन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सहभागी होण्यात स्वारस्य आहे.
Finolex Plason
Finolex PlasonAgrowon

अलीकडच्या काळात शेतकरी उत्पादक कंपनीच्या (Farmer Producer Company) माध्यमातून एका विशिष्ट संकल्पनेने सामुदायिक शेती (Group Farming) विकसित होत आहे. या उपक्रमात फिनोलेक्स प्लासॉन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (Finolex Plason Industries Pvt Ltd) कंपनीला सहभागी होण्यात स्वारस्य आहे. अशा उपक्रमांतून थेट शेतकऱ्यांसोबत जोडले जाऊन त्यांच्यासोबत प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या पातळीवर कामाचे नियोजन शक्य होते. फिनोलेक्स कंपनी ‘Gets People Together’ या संकल्पनेवर काम करते. फिनोलेक्स उद्योगाचा शेती आणि शेतकरी हा मूळ गाभा आहे.

Finolex Plason
Irrigation : उपसा जलसिंचन योजनांना वीजदरात सवलत कायम

फिनोलेक्स प्लासॉन कंपनीने मागील ३० वर्षांच्या कारकिर्दीत दहा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना ठिबक, तुषार सिंचन यंत्रणांचा पुरवठा केला. आमचे हेच ध्येय धोरण शेतकरी उत्पादक कंपनीच्या मूळ धोरणाशी संलग्न आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संचाचा पुरवठा करीत आहोत. उच्चतम गुणवत्ता आणि अति विशिष्ट ब्रँड प्रतिमेमुळे अनेक शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांनी आमची सूक्ष्म सिंचनासाठीची उत्पादने आणि तत्सम तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे.

शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद एक विशिष्ट उद्दिष्ट आणि कार्यप्रणालीत पुढे जात असतात. त्यांच्या पिकासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि सर्वांगीण व्यवस्थापन इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या असतात. अशा वेळेला अभ्यासू शेतकऱ्यांना योग्य तंत्रज्ञान आणि उत्पादनांचा पुरवठा करणे आवश्यक असते.यासाठी अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अधिकारी, सभासद यांच्याशी आम्ही सखोल चर्चा करतो. यातून असे लक्षात आले, की नुसत्या सूक्ष्म सिंचन उपकरणांच्या पुरवठ्यातून त्यांना अंशिक फायदा होऊ शकतो.

परंतु या सभासदांच्या सर्वांगीण फायद्यासाठी सूक्ष्म सिंचनासोबत वित्त पुरवठा, अर्थसाह्य व कृषिशास्त्रातील जागतिक पातळीचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सभासदांना राष्ट्रीयीकृत बँकेच्या माध्यमातून वित्त पुरवठा कसा होईल, शासनाच्या विविध योजनांतून अनुदान कसे मिळेल, पीक व्यवस्थापनाविषयी सल्ला तसेच युरोपियन गुणवत्तेची सर्वोत्तम कार्यक्षमतेची खते कशी उपलब्ध होतील याचा पाठपुरावा करतो.

शेतकऱ्यांना गरजेनुसार मार्गदर्शन करतो. आम्ही सभासदांना राष्ट्रीयीकृत बँकेद्वारे आवश्यक वित्त पुरवठा, तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे (PMKSY) ७५ ते ८० टक्के अनुदानासाठी शेतकऱ्यांना मदत केली. त्यांच्यासाठी विविध चर्चासत्रे, प्रशिक्षण कार्यक्रम, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी तसेच कंपनीच्या कार्यक्षेत्रावर भेटी आयोजित केल्या. शेतकऱ्यांना आवश्यक ती खते उपलब्ध करून त्यांचा योग्य वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन करतो. या सर्व तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी विविध पिकांचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत.

संपर्क ः सुनील पाटील, ९८२२५९८६९८

(उपाध्यक्ष, फिनोलेक्स प्लासॉन इंडस्ट्रीज प्रा. लि.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com