Agrowon Award : ‘अॅग्रोवन एक्सलन्स अवॉर्ड’चे आज पुण्यात वितरण

दर्जेदार रोपवाटिका (नर्सरी) उभारुन फलोत्पादन व भाजीपाला उत्पादनात राज्याला अग्रेसर ठेवणाऱ्या जिद्दी नर्सरीचालकांना मंगळवारी (ता. १३) पुण्यात ‘अॅग्रोवन एक्सलन्स अवॉर्ड’ दिले जाणार आहेत.
Agrowon Award
Agrowon AwardAgrowon

पुणे ः दर्जेदार रोपवाटिका (Nursery) (नर्सरी) उभारुन फलोत्पादन (Floriculture) व भाजीपाला उत्पादनात (Vegetable Production) राज्याला अग्रेसर ठेवणाऱ्या जिद्दी नर्सरीचालकांना मंगळवारी (ता. १३) पुण्यात ‘अॅग्रोवन एक्सलन्स अवॉर्ड’ (Agrowon Excellence Award) दिले जाणार आहेत.

Agrowon Award
Indian Agriculture : सामान्य शेतकऱ्यांनी गुंफली यशमाला

एका खास सोहळ्यात या अवॉर्डचे वितरण होणार आहे. कृषी क्षेत्रात प्रभावी माध्यम म्हणून ‘सकाळ अॅग्रोवन’ गेल्या १७ वर्षांपासून सक्षमपणे वाटचाल करतो आहे. शेतकऱ्यांना रोज शेतीविषयक समग्र माहिती देतानाच ‘अॅग्रोवन’कडून रोपवाटिका क्षेत्रातील घडामोडी, योजना, संशोधन, यशोगाथाही वेळोवेळी प्रकाशित केल्या जातात. यामुळे शेतकऱ्यांच्या लागवड सामग्रीची निवड व वापर करण्यास प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळते आहे.

Agrowon Award
Agriculture Credit : कृषी पतपुरवठा संस्थांचे संगणकीकरण करणार

सरपंच महापरिषद, अॅग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद असे स्तुत्य उपक्रम ‘अॅग्रोवन’ राबवितो आहे. मात्र, याचबरोबर विविध क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या कृषी उद्योजक व व्यावसायिकांचा गौरवदेखील ‘अॅग्रोवन’कडून केला जातो. राज्याच्या कृषी व्यवस्थेला बळकटी देण्यात रोपवाटिका क्षेत्राचा वाटा मोठा आहे. त्यामुळेच या व्यवसायाला परिश्रमातून समृद्ध करीत उत्तुंग भरारी घेणाऱ्या रोपवाटिकाचालकांना ‘अॅग्रोवन एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले जात आहे.

‘अॅग्रोवन एक्सलन्स अवॉर्ड’साठी निवड झालेल्या नर्सरी फर्मच्या प्रमुखांची नावे अशी ः राजेंद्र ठोंबरे, ठोंबरे फार्म अॅण्ड नर्सरी (खामगाव, जि. सोलापूर), ऋषिकेश तुपे, हिंदुस्थान हायटेक (पिंपरी, जि. सातारा), शार्दुल गोलंदे, भाग्यलक्ष्मी कन्सल्टन्सी कंपनी (औरंगाबाद), दिगंबर खांडरे, स्नेहल किसान नर्सरी (हिंगणघाट, जि. नागपूर), आदित्य गणेश गुळमे, बायोटेक पार्क करकंब (करकंब, जि.सोलापूर), महेश रसाळ, कृषिमित्र अॅग्रो इम्पेक्स प्रा.लि. (महाबळेश्वर, जि. सातारा), डॉ. दत्तात्रय सावंत, लॉर्डस् नर्सरी (शेंद्रा, जि.औरंगाबाद), कैलास माळी व पांडुरंग माळी, जे. के. रोपवाटिका (कुरपळ, जि.सांगली), रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी (मुंबई), अशोक उंडे, उंडे नर्सरी (बाभूळगाव, जि. नगर), राजेंद्र नन्नवरे, राजेंद्र नर्सरी (अरणगाव, जि. नगर), संतोष कुरकुटे, व्हीजन अॅग्रिटेक (माळकूप, जि. नगर), बी. ए. वरणकर, ग्रीनगोल्ड रोपवाटिका (सावनेर, नागपूर), भूषण निकम, साई यश नर्सरी (रायपूर, जि. नाशिक), विकांत काले, संकेत नर्सरी, (वाकडी खंडोबाची, जि. नगर), संदीप माळी व उमेश सोनार, देवेंद्र नर्सरी, (मोरफळ, जि. जळगाव), सोमनाथ अंबेकर, सत्यम शिवम् नर्सरी (कोळपा, जि. लातूर), राजेश गावडे, गावडे नर्सरी (जुन्नर, जि. पुणे).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com