जमिनी बळकावण्याचा जिल्हा बँकेचा डाव

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप; पालकमंत्री दादा भुसे यांना निवेदन
District Bank's move to grab land
District Bank's move to grab land Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा बँकेचा (District Bank) शेतकऱ्यांच्या सात-बारा (Satbara) उताऱ्यावर बोजा चढवून, भविष्यात लिलाव करत जमिनी बळकविण्याचा डाव आहे. असा आरोप करीत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना निवेदन देत हा प्रकार निदर्शनास आणून दिला.

District Bank's move to grab land
Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारले

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तत्कलिन सरकारने दीड लाखापर्यंत कर्जमाफी केली; मात्र २०१६ हे वर्ष टाळले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने २०१६ ते १९ पर्यंतची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली.

दोन लाखांवरील कर्जदारांची कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्यांना अनुदान जाहीर केले; मात्र दोन लाखांवरील कर्जमाफीबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

District Bank's move to grab land
Cotton Picking : कापूस वेचणीला झाली सुरुवात

दुसरीकडे जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनींवर बोजा चढवला आहे. त्यामुळे भविष्यात लिलाव करून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा हा डाव आहे. असा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य उत्तमराव वाघ, केशवराव जाधव, दत्तात्रय सुडके, विजय मापारी, बालकृष्ण पवार यांच्या शिष्टमंडळाने केला आहे.

District Bank's move to grab land
Soybean Rate : सोयाबीन बाजाराला पामतेलाचा आधार

राष्ट्रीय बँकांप्रमाणे जिल्हा बँकेनेदेखील व्याज माफ करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. भुसे यांनी निवेदनाची दखल घेत संबधित अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक आयोजित करू तसेच ठेवीदारांचे पैसे देण्याबाबत योग्य मार्ग काढून संबंधित अधिकारी व सहकारमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com