Crop cultivation : नावीन्यपूर्ण पीक लागवडीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी शुक्रवारी (ता. ४) कारंजा तालुक्यातील किन्ही (रोकडे), चांदई व अंबोडा या गावांतील काही शेतांना भेट देऊन नावीन्यपूर्ण पीक लागवडीची पाहणी केली.
Crop cultivation
Crop cultivation Agrowon

वाशीम : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी शुक्रवारी (ता. ४) कारंजा तालुक्यातील किन्ही (रोकडे), चांदई व अंबोडा या गावांतील काही शेतांना भेट देऊन नावीन्यपूर्ण पीक लागवडीची (Crop Cultivation) पाहणी केली. या वेळी त्यांनी या पीक लागवडीविषयी माहिती जाणून घेतली.

किन्ही (रोकडे) येथील पियूष काटकर यांनी बीबीएफ तंत्राने लागवड केलेल्या हरभरा पिकाची माहिती घेतली. पारंपरिक पीक पेरणी व बीबीएफ पीक पेरणीमुळे उत्पन्नात किती फरक पडतो हे त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेतले. चांदई येथील श्रीमती रक्षा मोटघरे यांच्या शेतात लागवड केलेल्या ड्रॅगन फळबागेची पाहणी केली.

या वेळी त्यांनी या नावीन्यपूर्ण फळबागेबद्दल माहिती घेतली. तसेच सघन आंबा लागवड, शेवगा लागवड तसेच इतर प्रकारे फळपीक लागवड केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची प्रशंसा केली. अंबोडा येथील शेतकरी गटामार्फत लागवड करण्यात आलेल्या करडई पिकाची पाहणी केली. सर्व शेतकरी हे हरभरा बीजप्रक्रिया करूनच पेरणी करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आले.

Crop cultivation
Crop Damage : ‘नुकसान भरपाई द्या, अन्यथा कोर्टात दाद मागू’

या वेळी तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र जटाळे, कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकणे, सुनील शिंदे, पी. बी. ठाकरे, मंडळ अधिकारी सी. डी. मनवर, तलाठी सविता देशमुख, कृषी सहायक मंगेश सोळंके, मोहन ठाकरे, सीमा पवार, राम मार्गे व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com