ड्रॅगन फ्रूटसाठी राज्यात जिल्हास्तरावर संकलन केंद्रे

राज्य परिषदेत निर्णय ः बाजारपेठ विस्तारासाठी प्रयत्न करणार
Dragon Fruit
Dragon FruitAgrowon

सांगली ः राज्यात ड्रॅगन फ्रट (Dragon Fruit) चे उत्पादन वाढत असून, त्यांच्या वितरणासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याचा निर्णय महाराष्‍ट्र ड्रॅगन फ्रूट असोसिएशनच्या वतीने आयोजित एकदिवसीय चर्चासत्रात झाला. कडेगाव (जि. सांगली) येथील लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयात आयोजित चर्चासत्रासाठी राज्यभरातून अडीचशे उत्पादक सहभागी झाले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले.

Dragon Fruit
अशी करा ड्रॅगन फ्रूट रोपनिर्मिती...

गेल्या चार-पाच वर्षांत राज्यात ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन वाढले आहे; मात्र त्याची बाजारपेठ विस्तारण्यासाठी शासनस्तरावरून अपेक्षित प्रयत्न होत नाहीत. त्यासाठी संघटनेच्या वतीने पुढाकार घेण्यासाठी म्हणून राज्यभरातील उत्पादकांची परिषद व एकदिवसीय चर्चासत्र झाले. त्यात जिल्हास्तरावर संकलन केंद्रे करून तेथे फळाची स्वच्छता, वर्गवारी आणि वितरणाचा निर्णय झाला. लागण करताना लाल-पांढरा आणि लाल-लाल फळ लागवडीचे प्रत्येकी पन्नास टक्के प्रमाण ठेवावे, असा निर्णय झाला. दिवसभरात कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख, डॉ. जी. करुणाकरन, डॉ. शिवाजीराव थोरात, श्रीमती संस्कृती पाटील, एन. व्ही. देशपांडे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, तालुका कृषी अधिकारी बाळकृष्ण कदम, डॉ. संग्राम धुमाळ, उद्यानश्री प्रकाश कुलकर्णी, श्रीनिवास रेड्डी, रमेश रेड्डी यांचे मार्गदर्शन झाले.
परिषदेचे आयोजन आनंदराव पवार, डॉ. मधुकर पोतदार व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com