Diwali Celebration : शेतकरी भामरे कुटुंबांचा सालदारांसोबत ‘दीपोत्सव’

दीपोत्सव सर्व कुटुंब एकत्र येऊन साजरा करतात. पण शेतात वर्षभर राबणाऱ्या सालदार, शेत मजुरांबरोबर दिवाळी साजरे करणारे शेतकरी कुटुंब तसे विरळच. काळगाव‌ व बेहेड (ता. साक्री) येथील भामरे कुटुंब आपुलकीचे नाते गेल्या २५ वर्षांपासून जपत आहे.
Farmer Diwali Celebration
Farmer Diwali Celebration Agrowon

दगाजी देवरे : सकाळ वृत्तसेवा

म्हसदी, जि. धुळे : दीपोत्सव (Deepotsav) सर्व कुटुंब एकत्र येऊन साजरा करतात. पण शेतात वर्षभर राबणाऱ्या सालदार, शेत मजुरांबरोबर (farm Labor) दिवाळी साजरे करणारे शेतकरी कुटुंब तसे विरळच. काळगाव‌ व बेहेड (ता. साक्री) येथील भामरे कुटुंब आपुलकीचे नाते गेल्या २५ वर्षांपासून जपत आहे. दिवाळीसाठी नवीन कपडे, चप्पल, बूट, फराळाच्या साहित्यासह दरवर्षी वेगळी भेट सालदारांना देऊन त्यांचा दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित करतात.

काळगाव येथील सरपंच संजय भामरे यांचे तीन भावंडांचे एकत्र कुटुंब. काळगाव आणि बेहेड शिवारात त्यांची १०७ एकर शेती आहे. त्यांचे वडील दिवंगत निंबाजी भामरे ग्रामविकास अधिकारी होते. वारकरी संप्रदायातील असल्याने त्यांनी सुरुवातीपासून एकी जपली. काळगाव, बेहेड शिवारात त्यांनी डाळिंब, सीताफळ, द्राक्ष बागेसह शेवग्याची उत्कृष्ट शेती फुलवली.

Farmer Diwali Celebration
Crop Damage : आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

फळबागेच्या ‘कृषी विस्तारापासून प्रगती ’ या उक्तीप्रमाणे शेतीत विकास साधला. त्यांच्याकडे आज सुमारे ३० सालदार, तर २५ कायमस्वरूपी मजूर आहेत. शेताची सर्व श्रमिक कामे ही मंडळी करतात. केवळ शेतीत प्रामाणिकपणे राबत सहकार्य करणाऱ्यांमुळे शेतीत प्रगती झाल्याचे भामरे बंधू मान्य करतात.

Farmer Diwali Celebration
Crop Damage : दिवाळी साजरी न करता नुकसानीची पाहणी करणार : विखे पाटील

दिवाळीत सालदारांना सहा दिवस सुट्टी दिली जाते. वर्षभरात एकदा सांगतील त्या धार्मिक व पर्यटनस्थळी सहल काढली जाते. वर्षभर कष्टाचे काम करणाऱ्या सालदार, गड्यांबरोबर दीपोत्सव साजरे करणारे भामरे कुटुंबासारखे इतर असतीलही, मात्र गेल्या ४० वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करणारे अनेक सालदार त्यांच्याकडे आहेत, हे विशेष.

तिन्ही भावंडांसह सालदारांची एकी...!

शेतीकामासाठी तिन्ही भावंडांसह सालदारांची एकी आहे. फळबागांची घेतली जाणारी काळजी, फवारणीसह अन्य सर्व कामांचे नियोजन केले जाते. मनाला उभारी, प्रसन्नता असली तर सर्व कामे चांगली होतात. यासाठी कष्ट करणाऱ्यांसाठी काही तरी वेगळे करण्यासाठी भामरे बंधूंचा नेहमी प्रयत्न असतो. स्वतः: संजय भामरे, लहान बंधू राजेंद्र भामरे हे शेतकरी आहेत. भाऊ विजय भामरे म्हसदी येथील आश्रमशाळेत मुख्याध्यापक आहेत. मुले गिरीश भामरे, योगेश भामरे‌ यांचे शेतीत सहकार्य असते.

शेतात राबणाऱ्यांना आम्ही आमच्या परिवारातील मानतो. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन त्यांना आपलेसे करण्याची आमची परंपरा आहे.
संजय भामरे, कृषी भूषण, काळगाव.
वीतभर पोटाच्या खळगीसाठी कुठेही काम करावे लागते. परंतु सणासुदीला आम्हाला सोबत घेणारे भामरे कुटुंब खरंच आनंद देणारे आहे.
काशिनाथ सोनवणे, ज्येष्ठ सालदार.
शेतीत राबणाऱ्याची हमखास प्रगती आहे. दरवर्षी शेतीत जिवाभावाची साथ देणाऱ्या सालदारांसोबत दिवाळी साजरी करताना वेगळे समाधान मिळते.
संदीप भामरे, शेवगा उत्पादक, काळगाव.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com