Grape : द्राक्ष बागायतदारांची दिवाळी बागेतच

द्राक्ष बागातदारांची दिवाळी तर द्राक्षबागेतच गेली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. द्राक्ष बागेत साठलेले पाणी, बागेवर येऊ घातलेले रोग, यामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon

तासगाव, जि. सांगली : तासगाव तालुक्यातील शेतकरी यावर्षीच्या पावसामुळे (Heavy Rainfall) अभूतपूर्व अडचणीत सापडला असून द्राक्ष बागातदारांची दिवाळी तर द्राक्षबागेतच गेली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. द्राक्ष बागेत (Grape Farm) साठलेले पाणी, बागेवर येऊ घातलेले रोग, यामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत, तर सोयाबीन लागण (Soybean) केलेले शेतकरी डोक्याला हात लावून बसले आहेत.

Crop Damage
Citrus Crop : लिंबूवर्गीय संस्था आणि शेर-ए-काश्मीर कृषी विद्यापीठात सामंजस्य करार

‘वरुणराजा कधी बरसणार,’ असे म्हणणाऱ्या दरवर्षी शेतकऱ्यावर यावर्षी ‘वरुणराजा, आता परत जा,’ म्हणण्याची वेळ आली आहे. तालुक्याचा आर्थिक कणा असलेली द्राक्ष शेती यावर्षी अभूतपूर्व अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी अद्याप द्राक्षबागांमध्ये पाणी साठले आहे.

त्या पाण्यातूनच औषध फवारण्याचे प्रयत्न करताना शेतकरी दिसत आहेत. दुसरीकडे, बागेतील चिखल आणि त्यातून फिरणाऱ्या ट्रॅक्टरमुळे वेलीची मुळी थांबू नये, यासाठी प्रयत्न करावा लागत आहे. चिखलात अडकलेल्या ट्रॅक्टरला बाहेर काढण्यासाठी दुसरा ट्रॅक्टर लावावा लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

अशा एक ना अनंत अडचणी सुरवातीपासूनच उभ्या राहिल्या आहेत. द्राक्ष बागायतदारांंची दिवाळी यंदा द्राक्षबागेतच आणि दिवाळीचे अभ्यंगस्नान बागेतील औषध फवारणी झाल्यावर, असेच चित्र सगळीकडे पाहायला मिळाले.

शेकडो एकर पोंग्यात असलेल्या द्राक्ष बागांना ‘डाऊनी’चा फटका बसला आहे. आगाप छाटणी घेतलेले शेतकरी अडचणीत आले आहेत. आता छाटण्यांना वेग आला असला तरी पुढे एकाच वेळी द्राक्ष बाजारपेठेत आल्याने दर कोसळण्याचा धोकाही संभावतो आहे. खरीप पिकालाही शेवटच्या टप्प्यात पावसाने धोका दिला. सोयाबीन, कडधान्ये उभ्या शेतात कुजल्याने कोरडवाहू शेतकरीही डोक्याला हात लावून बसला आहे.

ओल्या दुष्काळाचे अभूतपूर्व संकट

यावर्षी शेतकऱ्यांसमोर ओल्या दुष्काळाचे अभूतपूर्व संकट उभे असताना ना चौकशी, ना पंचनामे! महसूल विभागाचा संप सुरू आहे; तर खासदार, आमदार यावर बोलण्यास तयार नाहीत, असा अनुभव शेतकरी घेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com