
Akola News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाअंतर्गत (River Campaign) नदी संवाद यात्रा पूर्ण झाल्यानंतर त्या-त्या नदी क्षेत्रात करावयाच्या (River Conservation) विविध उपाययोजनांची कामे करण्यासाठी तालुकास्तरीय अधिकारी, सरपंच व नदी संवाद यात्री यांनी संयुक्त बैठका घेऊन नदी विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा (Neema Arora) यांनी दिले.
‘चला जाणू या नदीला’, या अभियानाचा आढावा त्यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी अरोरा यांच्यासह अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे तसेच नदी संवाद यात्री प्रमोद सरदार व अरविंद नळकांडे तसेच नदी यात्री तुषार हांडे तसेच नदी परिक्रमा झालेल्या गावचे सरपंच आदी उपस्थित होते.
अकोला जिल्ह्यातील पिंजरडा या नदीची उगम ते संगम ही नदी संवाद यात्रा पूर्ण करण्यात आली. तर अमरावती जिल्ह्यातून येणारी चंद्रभागा नदीच्या अकोला जिल्हा हद्दीतील एका गावातही यात्रा झाली आहे.
नदीच्या या परिक्रमेत नदीच्या अस्वच्छतेची कारणे, तेथे झालेले अतिक्रमणे, मातीचे रक्षण, प्रदूषण आदींबाबत माहिती संकलन करण्यात आली असून या उपक्रमाद्वारे गावकऱ्यांच्या सहयोगातून ही कामे करावयाची आहेत.
त्यासाठी नदी खोऱ्यांचे नकाशे, पाणलोट क्षेत्र नकाशे, पर्जन्यनोंदी, अतिवृष्टी, अतिक्रमणे इत्यादी माहिती घेऊन उपाययोजनांसाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी व गावचे सरपंच व ग्रामस्थांनी मिळून तालुकास्तरावर बैठका घेऊन नदी विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरोरा यांनी दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.