Crop Damage : अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करा

ई- पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शेतकऱ्यांना ते डाउनलोड करून त्यावरूनच ऑनलाइन ई- पीक पाहणी नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाने शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करावी.
Heavy Rainfall
Heavy RainfallAgrowon

धुळे ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) झालेल्या नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) कृषी विभागाने (Department Of Agriculture) महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या (Department Of Rural Development) समन्वयाने पूर्ण करून तातडीने अहवाल सादर करावा, अशी सूचना नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली.

Heavy Rainfall
Crop Damage : अमरावती जिल्ह्यातील ३१ टक्के क्षेत्रातील खरीप बुडाला

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. बी. जोशी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सी. वाय. पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक प्रशांत बिलोलीकर, शिरपूरचे प्रांताधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील (प्रशासन), डॉ. अरविंद अंतुर्लीकर (निवडणूक), सुरेखा चव्हाण, महेश जमदाडे (भूसंपादन), जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. ए. तडवी, हेमंत भदाणे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले आदी उपस्थित होते.

Heavy Rainfall
Crop Damage : पिकातील अतिरीक्त पाणी बाहेर कसे काढाल?

आयुक्त श्री. गमे म्हणाले, की पंचनामे प्रक्रियेविषयी कार्यशाळा यापूर्वीच झाली आहे. त्यानुसार कृषी विभागाने तातडीने पंचनामे पूर्ण करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. ई- पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शेतकऱ्यांना ते डाउनलोड करून त्यावरूनच ऑनलाइन ई- पीक पाहणी नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाने शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करावी. जिल्हा पुरवठा विभागाने आयएसओ नामांकन प्राप्त करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. त्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार, तहसील कार्यालयाच्या समन्वयातून हे काम पूर्ण करावे. त्याबरोबरच शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करून घ्यावी. गुदामांची नियमितपणे तपासणी करावी.

लवकरच पंचनामे पूर्ण करू ः जिल्हाधिकारी

१ ऑगस्टपासून नवीन महसूल वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे महसूल वसुलीवर भर द्यावा, असेही आयुक्त गमे यांनी सांगितले. रोजगार हमी योजना, भूसंपादन, अर्धन्यायीक प्रकरणांचाही त्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी धुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जून, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे लवकर पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com