G- 20 Council : संत्रा-कापसाचे ब्रॅण्डिग ‘जी-२०’ परिषदेत करा

‘जी-२०’ परिषदेतून नागपूरचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असे ब्रॅण्डिग करण्याचे प्रस्तावित आहे. संत्रा व कापसाचा कुठेच उल्लेख केला जाणार नाही. हा या भागातील पीक उत्पादकांवर अन्याय ठरणार आहे.
G- 20 Council
G- 20 CouncilAgrowon

नागपूर ः ‘‘भारतासह १९ देश आणि युरोपीय महासंघाचा समावेश असलेल्या ‘जी-२०’ गटाची परिषद नागपुरात (G-20 Council IN Nagpur) होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून टायगर कॅपिटल ऑफ इंडियासोबतच नागपुरी संत्र्यांचे ब्रॅण्डिंग (Orange Branding) करावे, अशी मागणी आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. पत्रानुसार, ‘जी-२०’ गटाची परिषद मार्च २०२३ मध्ये होत आहे.

यातील एका गटाची बैठक विदर्भातील नागपुरात होत आहे. ही विदर्भातील नागरिकांसाठी गौरवाची बाब आहे. विदर्भात संत्रा व कापूस ही दोन मुख्य पिके आहेत.

परंतु ‘जी-२०’ परिषदेतून नागपूरचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असे ब्रॅण्डिग करण्याचे प्रस्तावित आहे. संत्रा व कापसाचा कुठेच उल्लेख केला जाणार नाही. हा या भागातील पीक उत्पादकांवर अन्याय ठरणार आहे.

नागपूर व अमरावती विभागात जवळपास १ लाख ६० हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. संत्र्याची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. संत्रा, कापूस उत्पादक शेतकरी या पिकांवरच अवलंबून आहेत.

त्यामुळे या पिकांना जागतिक ओळख मिळवून देण्याची नामी संधी ‘जी-२०’ परिषदेच्या माध्यमातून मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या संदर्भातील पत्र देण्यात आले आहे.

G- 20 Council
G-20 Conference : ‘जी-२०’निमित्त नागपूरचे ब्रँडिंग जागतिक दर्जाचे करा

पाहुण्यांचे स्वागत संत्रा देऊन करा

पाहुण्यांचे स्वागत सुताचा हार व भेटवस्तू म्हणून नागपुरी संत्र्यांची दोन डझन फळे असलेले बॉक्‍स देऊन करावे. संबंधितांनी चव घेतल्यावर त्यांना आवडल्यास संत्रा, कापूस निर्यातीला चालना मिळेल.

विशेष म्हणजे या संदर्भातील नियोजन पर्यटन विकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेता विदर्भातील कापूस, फळपिकांचे ब्रॅण्डिंग करावे, अशी मागणी कडू यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com