Seed Treatment : रब्बी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्‍य करा ः डॉ. इंगळे

यंदा अति पाऊस झाल्याने वातावरणात सतत आर्द्रता राहिली. खरिपात यामुळे कपाशीसांरख्या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून आलेला आहे.
Rabbi Season
Rabbi Season Agrowon

अकोला ः यंदा अति पाऊस झाल्याने वातावरणात सतत आर्द्रता राहिली. खरिपात यामुळे कपाशीसांरख्या (Cotton Disease) पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून आलेला आहे. आता सर्वत्र रब्बीची (Rabi Season) तयारी सुरू असून, शेतकऱ्यांनी पेरणी (Rabi Sowing) करण्यापूर्वी बियाण्यांची १०० टक्के बीज प्रक्रिया (Seed Treatment) करावी. पीक उत्पादनाच्या (Crop Production) दृष्टीने ही बाब अत्यंत गरजेची आहे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले.

Rabbi Season
Rabbi Sowing : रब्बी पेरणी का पडतेय लांबणीवर ? | ॲग्रोवन

या पदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर त्यांनी बुधवारी (ता. ९) ‘ॲग्रोवन’ला रब्बी हंगाम तयारी व नियोजनाबाबत माहिती दिली. डॉ. इंगळे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात यंदा अनेक वर्षानंतर सर्वाधिक पाऊस झालेला आहे. या पावसामुळे खरिपात काही पिकांचे नुकसान झाले. शिवाय सततच्या ओलसर वातावरणामुळे पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला.

कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य ‘दहिया’सारख्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. रब्बी हंगामात पेरणी करताना शेतकऱ्यांनी आतापासूनच काळजी घेतली तर फायदा होईल. गहू, हरभरा लागवडीपूर्वी शेतकऱ्यांनी जैविक, रासायनिक स्वरूपाची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. यामुळे संभाव्य कीड-रोगांना पायबंद घालण्यास मदत होईल.’’

Rabbi Season
Rabbi Sowing : रब्बी पेरणी का पडतेय लांबणीवर ? | ॲग्रोवन

रब्बी हंगामासाठी जिल्ह्याला ४६४७१ टनाचे वाटप मंजूर झालेले आहे. त्यामधून ६ नोव्हेंबरपर्यंत ८९६२ टनांचा पुरवठा झाला. शिवाय ३० सप्टेंबर अखेर २७५३९ टन साठा शिल्लक होता. हा दोन्ही मिळून ३६५०१ टन साठा झाला. रब्बी पिकांची लागवड सुरू झाली असून, आतापर्यंत ७२४० टन खतांची विक्रीसुद्धा झालेली आहे.

हंगामासाठी डीएपी, तसेच संयुक्त खताचा मुबलकसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी हरभऱ्यासाठी युरियाचा वापर करण्याची गरज नाही. आवश्‍यकतेनुसार गव्हाच्या पिकाला हे खत देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com